रावेर (प्रतिनिधी) – कृती फाऊंडेशनच्या वतीने रावेर तालुक्यातील दुर्गम भागातील कळमोदा या गावात ग्राम स्वच्छता
मोहीम राबविण्यात आली. यात सर्वप्रथम संपूर्ण गावातील कचरा जमा करुन गावाच्या बाहेर नेऊन जाळण्यात आला. तदनंतर संपूर्ण गावात निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायझर व सोडियम हाईपोक्लोराईड फवारणी करण्यात आली. सदर उपक्रमाची संकल्पना कृती फाउंडेशन सचिव जी.टी.महाजन, पोलीस बिनतारी संदेश विभाग नाशिक शहरचे सफौ अफजल तडवी यांची असून पोलीस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी, सलीम तडवी, जिल्हा विशेष शाखेचे दीप्ती अनफट, चेतन निंबोळकर यांनी या मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदविला.








