आटपाडी (प्रतिनिधी सादिक खाटिक) – खानापूर तालुक्यातील करंजे – यादवमळा रस्त्यासाठी गेली १८ दिवस विटा
तहसील कार्यालया समोर ठिय्या आणि आज पासून आमरण उपोषणाचे आंदोलन करीत असलेल्या करंजे ग्रामस्थांच्या आंदोलन स्थळी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयंतराव पाटील यांनी भेट देवून, तुमच्या रस्त्याच्या प्रश्नी मी जिल्हाधिकारी ,तहसीलदारांना बोलतो, हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल. तुम्ही आमरण उपोषण सोडा असे आवाहन केले आणि तात्काळ तहसीलदारांना सूचना दिल्या. मंत्री महोदयांच्या सकारात्मक आश्वासनाचा आदर करून आंदोलनकर्त्यानी उपोषणाचे आंदोलन स्थगित करीत आवाहनास प्रतिसाद दिला . गत ७० वर्षापासून या रस्त्याचा प्रश्न प्रलंबीत आहे . अतिशय महत्वपूर्ण प्रश्नी न्याय भूमिका घेतल्या बाबत जयंतराव पाटील यांचे परिसरातील नागरिकांनी आभार मानले असून, या आंदोलनात सहभागी होणारे व पाठिंबा देणाऱ्या तसेच या रस्त्यासाठी झगडणाऱ्या करंजेच्या तिन्ही पिढ्यांचे, नेते, कार्यकर्ते, पक्ष संघटनांचे अभिनंदन करण्यात येत आहे.








