बुलडाणा टिव्ही जर्नालिस्ट असोसिएशन ची नवीन जम्बो जिल्हा कार्यकारणी गठीत

जिल्हाध्यक्षपदी वसीम शेख सचिव युवराज वाघ तर कार्याध्यक्ष फहिम देशमुख
खामगाव (विशेष प्रतिनिधी) – पत्रकारांवर होत असलेल्या अन्याय ,अत्याचार व त्यांच्या न्याय हक्कासाठी गेल्या 12 वर्षापासुन टिव्ही जर्नालिस्ट असोसिएशन जिल्ह्यात एक लढाऊ संघटना म्हणून काम करत आहे, आज खामगाव येथील विश्राम भवन येथे असोसिएशनची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत आधीचे जिल्हाध्यक्ष अमोल गावंडे यांच्या कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा सुपूर्द केला , यावेळी असोसिएशन ची नविन कार्यकारणी करीता असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष राहुल पहुरकर यांच्या अध्यक्षतेखाली व सर्वानुमते संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी वसीम शेख, सचिव पदी युवराज वाघ, तर जिल्हा कार्याध्यक्ष पदी फहिम देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here