कोरोना रूग्णांच्या मदतीसाठी रक्तदान शिबिर आणि प्लाझ्मा शिबिर

ठाणे (प्रतिनिधी आमित जाधव) – कोरोना रूग्णांच्या मदतीसाठी रक्तदान शिबिर आणि प्लाझ्मा शिबिर आयोजित केले असून सर्व नागरिकांनी मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कोरोना समुपदेशन समितीचे अध्यक्ष श्री. अनिल काकडे यांनी केले आहे.
रविवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी कल्याण पश्चिम येथील स्वामी नारायण हाॅल, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शेजारी , शंकरराव चौक येथे सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सदर शिबिर आयोजित करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी ९३२४५५२९६३ किंवा ८१०४२११८१८ हया मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सदर शिबिरात रक्तदानासाठी सर्व नागरिक सहभागी होऊ शकतील मात्र प्लाझ्मासाठी कोरोना होऊन बरे झालेले रूग्ण सहभागी होऊ शकतील. शिबिरात प्लाझ्मा घेण्यात येणार नसून फक्त नोंदणी करण्यात येईल आणि नंतर ज्या कोरोना रूग्णांना प्लाझ्माची आवश्यकता असेल त्यांना प्लाझ्मा दात्यांचे नाव आणि मोबाईल क्रमांक दिले जातील अशी माहिती कोरोना समुपदेशन समितीचे अध्यक्ष श्री. अनिल काकडे यांनी दिली
सदर शिबिर कोरोना समुपदेशन समिती ( नियोजित), रक्तानंद ग्रुप, महाराष्ट्र आणि जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मिडटाऊन सहेली यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित केले असल्याचेही श्री. अनिल काकडे यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here