मुक्ताईनगर – शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापनदिनानिमित मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात शिवसेनेच्या वतीने शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या शुभ हस्ते भव्य अशा भगव्या झेंड्याचे पूजन करून अनावरण करण्यात आले .
प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई , अल्पसंख्याक जिल्हा संघटक अफसर खान , ऍड मनोहर खैरनार , विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, माजी तालुका प्रमुख तथा मार्गदर्शक प्रमोद देशमुख , शहर प्रमुख गणेश टोंगे , राजेंद्र हिवराळे, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील , जीवराम कोळी , माजी उपजिल्हा प्रमुख गोपाळ सोनवणे , जाफर अली ,मुशीर मणियार , शकुर जमदार , सलीम खान , जहीरशेख , शहर संघटक वसंत भलभले , स्वप्नील श्रीखंडे ,युवासेना उपजिल्हा अधिकारी पवन सोनवणे , युवासेना तालुका अधिकारी पंकज राणे , राजेंद्र तळेले, सुभाष सनांसे पिंटू पाटील , हरी माळी , किरण कोळी , पप्पू मराठे , दीपक पवार ,संतोष माळी ,शुभम शर्मा , मनोज मराठे, सुमेर राजपूत , आकाश सापधरे , दीपक खुळे, सोनू राजपूत , अमोल भोई आदींची उपस्थिती होती .






