धरणगांव येथे छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण कृती पुतळा उभारण्यासाठी पाठपूराव करणार मा.नगराध्यक्ष पी.एम.पाटील.सर

धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धा कुर्ती पुतळा असुन त्या ठिकाणी भव्य दिव्य असा छत्रपति शिवाजी महाराज यांचा पूर्णा कृति पुतळा उभारन्यासाठी शासन दरबारी पाठपूरावा करनार असल्याचे धरणगांव न.पा.चे मा.नगराध्यक्ष पी.एम.पाटील सर यांनी सांगितले.
२५मे२०१५ रोजी धरणगांव न.पा च्या जनरल मीटिंग मध्ये पूर्णा कृती पुतळा उभारण्या संदर्भात ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता परंतु त्या संदर्भात न.पा.प्रशासनाने आज तागायत कोणताही पाठपुरावा केला नाही यासंदर्भात पी.एम.पाटील सर यांनी सध्याचे मुख्याधिकारी श्री जनार्दन पवार यांना लेखी स्वरूपात निवेदन दिले असून योग्य ती कागद पत्राची पूर्तता करून तसा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठवावा आपण तात्काळ प्रस्ताव पाठविल्यास पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या सोबत जाऊन जितक्या लवकर पूर्णाकृती पुतळा बसविण्या संदर्भात महाराष्ट्र शासनाकडून परवानगी मिळविण्याचा प्रयत्न केला जाईल.
पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी तज्ञाचे मार्गदर्शन घेऊन त्यासाठी योग्य अशी जागेची पाहणी करून व त्यासाठी लागणारा खर्च या संदर्भात लवकरात लवकर ज्या ठिकाणी भव्य दिव्य असा पूर्णकृती पुतळा उभारला गेला असेल त्या ठिकाणी जाऊन त्याची संपूर्ण माहिती घेऊन सदर कामाला चालना देण्यात येईल.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य असा पुतळा उभारण्यासाठी सर्वांनी योग्य असे सहकार्य करून धरणगांव शहर व तालुक्यातील किंवा ज्यांना ही पुतळा उभारणी संदर्भात काही माहिती असेल किंवा मार्गदर्शन करावयाचे असेल त्याचे सहकार्य घेतले जाईल व योग्य अश्या जागेत पुतळा उभारण्यात येईल.
सर्व धरणगांववासी,तालुक्यातील नागरिकांनी या चांगल्या कामासाठी सहकार्य करण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील सर यांनी केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here