नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – कोरोणा विषाणुंच्या संकट काळात स्वतचा जीव धोक्यात घालुन लोकांपर्यत माहीत पोहचवण्यासोबत त्यांच्या अडीअडचणींचे निराकारण करणाऱया पत्रकार योद्धांच्या कार्याला पाठबळ देण्यासाठी आज नंदुरबार राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या वतीने नंदुरबार शहरातील पन्नास पत्रकार बांधवांची दोन लाखांपर्यतची कोरोणा मेडीक्लेम पॉलीसी काढण्यात आली आहे. अशा पद्धतीने पत्रकारांसाठी पुढाकार घेवुन कोरोणा मेडीक्लेम काढण्याचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम असुन आज प्रातिनिधीक स्वरुपात दहा पत्रकारांना विमा प्रदानचे पत्र राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे प्रदेक्षाध्यक्ष मेहबुब शेख यांच्या हस्ते देण्यात आले.
नंदुरबार राष्ट्रवादी युवक कॉग्रेसने राबविलेला हा उपक्रम निश्चितच अनुकरणीय असुन राज्यातील इतर जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या पदाधिकाऱयानी देखील अशा पद्दतीचे उपक्रम राबविता येईल का याबाबत सुचना देण्याचे देखील यावेळी युवक प्रदेक्षाध्यक्ष मेहबुब शेख यांनी सांगितले. आज मेहबुब शेख यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील चौपाळे येथे राष्ट्रवादी युवक कॉग्रेसची जिल्हा आढावा बैठक संप्पन झाली.यानंतर पत्रकारांसोबत वार्तालाप करतांना त्यांनी लॉकडाऊन काळात राष्ट्रवादी युवक कॉग्रेसने राज्यभर केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला.
मुळातच राष्ट्रवादीच्या विविध पदांवर संधी साधुन डोळा ठेवत आयत्यावेळी प्रवेश करणाऱयांना नियुक्ती देण्याएवजी पक्षात गेली अनेक वर्ष निष्ठेने काम करणाऱयांनाच संधी दिली जाईल हा आपला आणि राष्ट्रवादी पक्षाचा शब्द असल्याचे यावेळी त्यांनी ठासुन सांगीतले. राष्ट्रवादीचे निरीक्षकांनी आपला अहवाल प्रदेक्षाध्यक्षांकडे सादर केला असुन महिनाभरात फादर बॉडीच्या नियुक्त्या देखील होतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी नंदुरबार राष्ट्रवादी जिल्हा युवक अध्यक्ष यांनी पत्रकार ज्या विपरीत सामाजीक परिस्थीतीमध्ये धोका पत्कारुन समाजेसवा करत आहे हि बाब अतिशय स्तुत्य असुन त्यांच्या कार्याला बळकटी मिळावी याच अनुशंगाने हि मेडीक्लेम पॉलीसी काढल्याचे त्यांनी सांगितले. ४० वर्षांपर्यतच्या पत्रकार बांधवांसाठी दोन लाखांचा तर ४० वयोवर्षांवरील पत्रकारांसाठी एक लाख रुपयांची कोरोणा मेडिक्लेम पॉलीसी काढण्यात आली आहे. मुळातच पत्रकारांचे आरोग्य नेहमी निरोगी रहावे मात्र त्यांना कोरोणा बाधा झालीच तर त्यांच्या खाजगी रुग्णालयातील उपचारा दरम्यान खारीचा हातभार लागावा याच अनुशंगाने हि योजना राबविली असुन पहिल्या टप्यात प्रमुख अशा पन्नास पत्रकांसाठी ही मेडीक्लेम पॉलीसी काढली जाणार असल्याची माहीत सागर तांबोळी यांनी दिली. यावेळी या उपक्रमाबाबत जिल्हा मराठी पत्रकारसंघाचे पत्रकार हिरालाल चौधरी यांनी या संकल्पनेसाठी पत्रकारांच्या वतीने राष्ट्रवादी महिला अध्यक्ष हेमलता शितोळे आणि सागर तांबोळी यांचे आभार मानले
Home उत्तर महाराष्ट्र नंदुरबार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने पत्रकारांना दोन लाखाची मेडीक्लेम पॉलिसी







