- दिवसभरात 827 बाधीत, 11 बळी तर 697 कोरोना मुक्त
- वाईत सहा दिवस जनता कर्फ्यु
- राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने कोरोना बाधित
- शिवेंद्रसिंहराजे कडून 80 बेडचे कोविड सेंटर
- जंबो हॉस्पिटलची तयारी जोरदारपणे सुरू
- मेढा ग्रामीण रुग्णालयाच्या दारात मृत्यू
सातारा (जिल्हा प्रतिनिधी शरद मोरे) – जिल्ह्यात कोरोनाचे संकट अधिक गडद होत चालले आहे.कोरोना बाधित रुग्ण सापडण्यासाठी जशा अँटीजेन टेस्ट घेतल्या जात आहेत.तशाच टेस्ट अँटी बॉडी टेस्ट जिल्ह्यात नागरिक काळजी पोटी घेत आहेत. अँटीजेन टेस्टचे जास्त प्रमाणात घेतल्या जात असल्याने बाधितांचे प्रमाण वाढत आहे. दिवसभरात जिल्ह्यातील 827 एवढे बाधित आढळून आले तर 11 जणांचा बळी घेतला. दिवसभरात 697 जणांना घरी सोडण्यात आले. काल रात्री आलेल्या रिपोर्टनुसार राष्ट्रवाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने हे पॉझिटिव्ह आले. वाईतल्या व्यापारी महासंघाने मंगळवारपासून जनता कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्सिजन आणि मशनरी पुरवण्यासाठी शेकडो हात सरसावले आहेत. मेढा ग्रामीण रुग्णालयाच्या दारात एका बाधिताचा आज मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट सुरू आहे. पीकअवर सुरू असल्याने प्रत्येक तालुक्यातील रुग्णालयात बेड शिल्लक नाहीत.अशी सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे.जावली तालुक्यात मेढा हे शहर शनिवारपासून लॉक डाऊन केले आहे.कराड,वाई आणि सातारा या तीन शहरात तर चढाओढ लागली आहे.मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असल्याने भीती होत आहे.दुसऱ्या बाजूला रुग्ण सापडावेत यासाठी अँटिजेन टेस्ट घेण्याचे गावोगावी शिबिर होत आहेत. बाधित होण्याचे प्रमाण वाढते आहे.दिवसभरात जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होताना दिसतं आहे.सायंकाळी उशिरा आलेल्या अहवालात 827बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात बाधित होण्याचे पंधरा दिवसात डब्लिंग रेट झाला आहे.तर दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या अडीच पट एवढी झाली आहे.कोरोना महामारीने बाधित होण्याचे प्रमाण जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसात डब्लिंगने झाले आहे.दि.20 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात 337 जण बाधित आढळून आल्याने त्यावेळी आकडा 9 हजार 8 वर पोहचला होता.कोरोना मुक्त 260 जण झाले होते.त्यावरून जिल्ह्यात त्यावेळी 4 हजार 918 जण बरे झाले होते.681 जणांचे त्या दिवशी घशातले स्त्राव तपासणी केल्याने त्यावेळी 38 हजार 707 जणांची तपासणी केली होती.त्या दिवशी आठ जणांचा मृत्यू होऊन आकडा 277 वर पोहचला होता. तब्बल पंधरा दिवसांनी जिल्ह्याचा हाच आकडा दुप्पटीने वाढला आहे. 49 हजार 267 जणांचे नमुने आतापर्यंत तपासले.त्यापैकी 17 हजार 663 एवढे बाधित असून 10 हजार 471जणाना घरी सोडले आहे. 473 जणांचा मृत्यू झाला असून 6 हजर719 उपचारार्थ रुग्ण आहेत.मेढा शहर शनिवार ते शनिवार असा लॉक डाऊन सुरू केला आहे.रात्रीच्या अहवालात मेढा येथील 48 जण बाधित आढळून आले आहेत.तर सातारा तालुक्यातील महागाव हे आता हॉटस्पॉट ठरत आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने कोरोना बाधित
रहिमतपूर येथील सुनील माने हे पैलवान म्हणून त्यांची शरीर यष्टी चांगली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असल्याने त्यांना सतत लोकांचा संपर्क होतो.लोकांच्या सानिध्यात कुठे कधी त्यांना कोरोनाची बाधा झाली हे समजले नाही.परंतु त्यांनी तपासणी केल्यावर त्यांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला.ते उपचार घेत आहेत.
ऑक्सिजन मशीन, व्हेंटिलेटर साठी सरसावले शेकडो हात
जिल्ह्यात कोरोना बाधितांचा प्रमाण पाहता जिल्ह्यातील रुग्णालयात बेड शिल्लक नाही.शेकडो बाधित घरात उपचार घेत आहेत.जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेकांचे प्राण जात आहेत.सामाजिक संस्थांनी केलेल्या आवाहयानुसार जिल्ह्यातील अनेक दानशूर मंडळी पुढे येऊ लागली आहे.मदतीचा ओघ वाढला आहे.
शिवेंद्रसिंहराजे कडून 80 बेडचे कोविड सेंटर
सातारा जिल्हा रुग्णालयासह सर्वच खाजगी रुग्णालयांमध्येही बेड शिल्लक नाही आणि त्यामुळे रुग्ण दगावत आहेत. या भयावह परिस्थितीला कुठेतरी आळा बसावा, रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत या उदात्त हेतुने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सौ. वेदांतिकाराजे भोसले व कुटूंबीयांनी स्वमालकीच्या विसावा नाका येथील पुष्कर हॉल येथे स्वखर्चाने ८० बेडचे सुसज्ज असे कोव्हीड केअर सेंटर उभारले आहे. या सेंटरमध्ये ४० बेड हे ऑक्सिजन पुरवठ्यासह सुसज्ज असून उर्वरीत ४० बेड विना ऑक्सिजनयुक्त आहेत.दरम्यान, हे कोव्हीड केअर सेंटर रुग्णांच्या सेवेसाठी विनामोबदला जिल्हा प्रशासनाकडे चालवण्यासाठी देण्यात येणार असून येत्या बुधवारी हे सेंटर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे आणि त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली या सेंटरमध्ये बाधीतांवर उपचार सुरु होणार आहेत.
जंबो हॉस्पिटल सुरू करण्याची तयारी
वाढत चाललेली रुग्ण संख्या पहाता जिल्ह्यात उपचारासाठी जंबो हॉस्पिटल सुरू करण्याचे तयारी सुरू आहे.पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी वारंवार सूचना देऊन पाहणी करून येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात तयारी सुरू केलेली आहे.त्यानुसार संग्रहालय स्वच्छता करण्यात आली आहे.बेड व इतर बाबींची पूर्तता करण्यासाठी हालचाली सुरू आहे.
मेढा ग्रामीण रुग्णालयाच्या दारात मृत्यू
मेढा येथे ग्रामीण रुग्णालयाच्या दारातच व्हेंटिलेटर अभावी एका कोरोना बाधित रुग्णाने जीव सोडल्याची घटना घडली.तीन तास कोरोना बाधिताचा मृतदेह रुग्णालयाच्या दारात तशीच्या तशी रिक्षामध्ये निश्चित पडल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांचा काळजाचा ठोका चुकला होता.
मेढा शहरात फक्त चार दिवसात १५४ कोरोना बाधीत आढळून आले.पूनवडीचा उच्चांक मेढा मोडणार आहे. जावली तालुक्याचा हॉटस्पॉट तालुक्याचे मुख्यालय मेढा झाल्याने आख्खा तालुका हादरला आहे.
697 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 697 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 1003 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
1003 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 21, उपजिल्हा रुग्णालय कराड 74, उपजिल्हा रुग्णालय फलटण 72, कोरेगाव 92, वाई 106, खंडाळा 153, रायगांव 90, पानमळेवाडी 72, मायणी 105, महाबळेश्वर 60, तळमावले 9, व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 149 असे एकूण 1300 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
शनिवार पर्यंत जिल्ह्यात घेतलेले एकूण नमुने — 49267, एकूण बाधित — 18490, घरी सोडण्यात आलेले — 10471, मृत्यू — 473, उपचारार्थ रुग्ण — 7546
शनिवारी जिल्ह्यात बाधित 827, मुक्त 697, मृत 11







