जमिनीच्या वादातून एका माजी आमदाराची हत्या करण्यात आली आहे

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील हत्याकांडांची मालिका सुरुच असून, तीन वेळा आमदार राहिलेल्या निर्वेंद्र मिश्रा यांची हत्या करण्यात आली आहे माजी आमदार निर्वेंद्र मिश्रा यांचा लखीमपूर खीरी येथे बेदम मारहाणीत मृत्यू झाला. मिश्रा आणि विरोधी गटात जमिनीचा वाद होता. रविवारी दोन्ही गटात जमिनीवरून किरकोळ वाद सुरू झाला. त्यानंतर वाद शिगेला गेल्यानंतर हाणामारी सुरू झाली. यात मिश्रा यांना बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या मिश्रा यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
या वादात मिश्रा यांचा मुलगाही जखमी झाला असून, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिश्रा हे तीन वेळा आमदार होते. दोन वेळा ते अपक्ष म्हणून निवडून आले होते. मिश्रा यांच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here