[ad_1]
मुंबई | राज्यात वाढती कोरोनाबाधितांची आकडेवारी चिंतेचा विषय ठरतो आहे. राज्य सरकार आणि प्रशासन कोरोनाचा संसर्ग आटोक्यात यावा म्हणून प्रयत्नांची शिकस्त करत आहे. सरकार आणि प्रशासनाला याकामी काही प्रमाणात यश देखील मिळत आहे. कधी आकडेवारी वाढते आहे तर कधी कमी होते आहे. असं असलं तरी रूग्णांचं बरे होण्याचं प्रमाण देखील आता वाढतं आहे.
राज्यात काल 1550 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 49 हजार 356 झाली आहे. म्हणजेच आज ही संख्या 50 हजारांपर्यंत किंवा 50 हजार क्रॉस करण्याची शक्यता आहे. तर नव्या कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वरचेवर वाढत असताना अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या आता स्टेबल ठेवण्यात सरकारला यश येत आहे. कारण कोरोना पेशंटची बरे होण्याची टक्केवारी वाढली आहे.
शनिवारी कोरोनाच्या 3427 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 51 हजार 379 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. कोरोनाबाधितांची संख्या जरी 1 लाखांवरून अधिक असली तरी प्रत्यक्षात मात्र 51 हजार 379 रुग्णांवर उपचार सुरू आहेत म्हणजेच अॅक्टीव्ह केस आहेत.
राज्यात सध्या 55 शासकीय आणि 42 खाजगी अशा एकूण 97 प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत.आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 6 लाख 41 हजार 441 नमुन्यांपैकी 1 लाख 04 हजार 568 नमुने पॉझिटिव्ह (16. 03टक्के ) आले आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
मुंबईतील ‘हा’ परिसर ठरतोय आता कोरोनाचं हॉटस्पॉट
“खासगी प्रयोगशाळांकडून चाचण्या करून घेण्यासाठी महापालिका तयार पण सवलतीचे दर द्यावेत”
महत्वाच्या बातम्या-
अनलॉकडाऊनचा महाराष्ट्राला मोठा फटका, अवघ्या 6 दिवसात वाढले इतके रुग्ण!
‘…म्हणून राज्यात कोरोना वाढला’; रामदास आठवलेंचा सरकारवर गंभीर आरोप
सैराटमधल्या सल्याची दिलदारी; हजारो कुटुंबांना केली मदत!
[ad_2]
Source link






