शिक्षकदिनानिमित्त शिक्षकांना देण्यात आला नेशन बिल्डर अवार्ड-2020

रोटरी क्लब चोपडा यांचा स्तुत्य उपक्रम, १६ शिक्षक सन्मानित.

चोपडा (संदीप ओली) – रोटरी क्लब चोपडा ने ५ सप्टेंबर २०२० रोजी शिक्षकदिनाचे औचित्य साधुन शिक्षकांना “नेशन बिल्डर अवार्ड २०२०”देऊन त्यांचा सत्कार केला.शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांसाठी रोटरी इंडिया लिटरेसी मिशन (आरआयएलएम)चा हा उपक्रम आहे.विद्यार्थ्यांना ज्ञान देऊन राष्ट्र निर्मितीत मोलाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना रोटरी क्लब तर्फे सन्मानित करण्यात येते,
कोरोनामूळे या वर्षी हा पुरस्कार दोन टप्प्यात देण्यात येणार आहे. सुरवातीला रोटरी परिवारातील शिक्षक तर दुसऱ्या टप्यात तालुक्यातील इतर शिक्षकांना सन्मानित करण्यात येणार आहे असे रोटरी क्लब,चोपडा चे अध्यक्ष नितीन अहिरराव यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चोपडा येथील ज्येष्ठ आदर्श शिक्षक श्री. अशोक निळकंठ सोनवणे यांच्या हस्ते “नेशन बिल्डर अवार्ड-2020” ने सोळा शिक्षकांना पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.त्यामधे सौ.आशा वाघजाळे,भालचंद्र पवार,गौरव महाले,हरिश्चंद्र अग्रवाल,लक्ष्मण एन.पाटील,महेंद्र बोरसे,पंकज पाटील,प्रिती पाटील,राधेश्याम पाटील,विलास पाटील,सुनिता पाटील,संध्या गुजराथी,एम. डब्ल्यू पाटील,ईश्वर सौंदाणकर, सौ.सुरेखा पाटील,रमेश वाघजाळे अशा सोळा शिक्षकांना “नेशन बिल्डर अवार्ड-2020” ने सन्मानित करण्यात आले.
श्री.अशोक सोनवणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिक्षकांचे समाजातील महत्त्व व राष्ट्र निर्मितीत असलेले त्यांचे योगदान किती मौल्यवान आहे हे सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक निळकंठ सोनवणे,रोटरी क्लब,चोपडा चे अध्यक्ष नितीन अहिरराव सचिव रुपेश पाटील,शिक्षक प्रतिनिधी मुरलीधर पाटील,प्रकल्प प्रमुख पृथ्वीराज राजपूत यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन व पॉल हॅरिस व सरस्वती मातेच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आली.
श्री राधेश्याम पाटील,सौ आशा वाघजाळे,गौरव महाले व संध्या गुजराथी यांनी “नेशन बिल्डर अवार्ड-2020″पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रतिनिधी म्हणून आपले मनोगत व्यक्त केले तसेच प्रमुख पाहुण्यांचा परिचय विलास पाटील यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सचिव रुपेश पाटील यांनी केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here