संतोष फाऊंडेशनचा एक हात मदतीचा

पुणे (प्रतिनिधी सुनिल बोसले) – शिवसेनेचे शाखाप्रमुख हरेश दत्ताराम शिवलकर यांनी संतोष फॉउंडेशन मुंबई या सामाजिक संस्थेच्या वतीने मुंबईतील चुनाभट्टी येथील व आसपासच्या परिसरातील अनेक गायक, वादक कलाकारांना अन्नधान्याचे किट मदत वाटप केले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनच्या काळात आणि सध्याच्या कठीण परिस्थितीत असंख्य गोरं गरिबांना , गरजू नागरिकांना , कलाकारांना शिवसेनेचे शाखाप्रमुख व संतोष फाऊंडेशनचे अध्यक्ष हरेश दत्ताराम शिवलकर यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून सदैव संतोष फाऊंडेशन मुंबई या संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. संतोष फाउंडेशनच्या उपाध्यक्ष सुप्रसिद्ध अभिनेत्री उपासना सिंह यांच्या मातोश्री दिवंगत संतोष यांच्या स्मरणार्थ अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत. तसेच समाजातील सर्व स्तरातील लोकांना नेहमीच मदत वाटप केले जाते असे मनोगत शिवसेनेचे शाखाप्रमुख व संतोष फाऊंडेशनचे अध्यक्ष हरेश दत्ताराम शिवलकर यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here