आदिवासी भागातील जनतेचे दुर्दैव
नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – भारताला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्षे झालीत तरीही धडगाव तालुक्यातील
अतिदुर्गम भागातील वेलखेडी ग्रामपंचायतमधील पलासपाडा व सेंद्र्यापाड्याला जाण्यासाठी रस्ता नसल्याने तेथील लोकांच्या दळणवळणाचा प्रश्न गंभीर आहे. जर कोणी येथे आजारी पडले तर त्या रुग्णाला दवाखान्यापर्यंत नेण्यासाठी ग्रामस्थांना कठोर परिश्रम करावे लागतात. बऱ्याच वेळा वेळेवर दवाखाना न गाठल्याने रुग्णाला प्राण गमवावे लागत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या गाबांना रस्ता मिळावा यासाठी मागील 10 वर्षापासुन सतत मागणी करित असलेल्या या ग्रामस्थांना आजपावेतो रस्ता मंजुरी न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. अर्थातच रस्ता नसल्याने, आधुनिक दळणवळणांच्या साधनांपासून ही गावे
वंचित आहेत. त्यामुळे तेथील ग्रामस्थ रस्ता नसल्याने रोग्याला आदिवासींची बांबूची झोळी करुन याच आपत्कालिन वाहनाच्या सहाय्याने दवाखान्यापर्यंत डोंगर-दऱ्या मधून कसेतरी नेण्याचा प्रयत्न ग्रामस्थ नेहमी करत असतात.
10 वर्षापासुन सतत रस्त्याची मागणी करत असलेल्या या ग्रामस्थांना आजही मोठ्या संकटांना सामोरे जावे लागतेय ही खुप मोठी दुःखाची बाब आहे .तसेच शासनाने आमच्या मागण्याला दुर्लक्ष केलेले असुन आता तरी आमच्या मागण्या पुर्ण कराव्यात मत गाव वासिंनी कले ,तसेच एक वर्षापुर्वी नंदुरबारच्या
खासदार डॉ.हिना गावीत यांनी या गावाला भेट दिली असता ग्रामस्थांनी ताई यांना निवेदन दिले होते त्यावेळी ताईंनी 20 ते 25 दिवसात रस्त्याला उद्घाटन करू असा विश्वास दिला होता परंतू आज एक वर्ष पुर्ण झाले तरी रस्ता मंजुरी न झाल्याने ग्रामस्थांनी तिव्र नाराजी व्यक्त केली व हिना ताई दिलेले आश्वासन पुर्ण करतील का ? शासन आमच्या मागण्या पुर्ण करणार का ? असे प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थीत केले
तसेच वारंवार मागणी करुनही आमच्या मागण्या पुर्ण होत नाही ,शासन आमच्याकडे दुर्लक्ष करित असल्याचा दावा त्यांनी केला व शासनाने आता तरी लवकरात लवकर आमची मागणी पुर्ण करावी अशी अशी मागणी धडगाव तालुक्यातील पलासपाडा व सेंद्र्यापाडा येथील ग्रामस्थांनी केली सरकार यांच्या मागण्या पुर्ण करतील का ? याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे
यावेळी ग्रामस्थ सुनिल पाडवी,सिकाराम पावरा,विक्रम पाडवी,प्रताप नाईक,जितेंद्र वळवी,तुषार वसावे , छगन पावरा , शिवाजी पाडवी हे उपस्थित होते.








