लायन्स क्लब जळगाव सेन्ट्रलतर्फे शिक्षकांचा गौरव

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिवस साजरा केला जातो. कोरोना काळात विद्यार्थ्यापर्यंत ऑनलाईन शिक्षणाचे सृजनशील मार्ग शोधणाऱ्या व ऑनलाईन शिक्षण पोह्चवनाऱ्या शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
ऑनलाईन शिक्षणातील अडथळ्यांवर मात करून धडपडनाऱ्या पुढील २८ शिक्षकांचा गौरव करण्यात आला:- बाहेती महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. अनिल लोहार, श्री.एस.एम कोगटा, श्री के व्ही पाटील, रायसोनी महाविद्यालया चे प्राचार्या सौ. प्रीती अग्रवाल, डॉ. मकरंद वाठ, श्री रफिक शेख, किड्स गुरुकुल इंटरन्याशनल स्कूल च्या मुख्याध्यापिका मिस मीनल जैन, सौ.ममता खोना, सौ श्रद्धा तलरेजा, उज्वल स्कूल च्या मुख्याध्यापिका सौ. मानसी भदादे, सौ. मनीषा ढाके, सौ. सुनयना चोरडिया, एम जे महाविद्यालायचे प्राचार्य श्री संजय भारंबे, श्री.जयप्रकाश चौधरी, डॉ. भूपेंद्र केसुर, आय.एम.आर महाविद्यालया च्या प्राचार्या डॉ. शिल्पा बेंडाळे, डॉ. अनुपमा चौधरी, डॉ. विशाल संदानशिव, प्रोग्रेसिव इंग्लिश मिडीयम स्कूल च्या मुख्याध्यापिका सौ. श्रध्दा धुनाके, सौ. सुनिता नारखेडे, सौ. विजया चावरे, प्रगती माध्यमिक विद्यालय च्या मुख्याध्यापिका सौ. मनीषा पाटील सौ.भाग्यश्री तळेले, प्रगती विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका सौ. शोभा फेगडे, यांचा गौरव करण्यात आला.
चित्रकला शिक्षक श्री.तरुण भाटे, Abacus शिक्षिका सौ.तृप्ती नागदा, नृत्य शिक्षक श्री.अखिल तिलकपुरे, क्रीडा प्रशिक्षक श्री.अतुल देशपांडे यांचाही सन्मान करण्यात आला.
हा सन्मान सोहळा प्रत्येक शाळा आणि कॉलेज मध्ये जाऊन करण्यात आला या कार्यक्रमासाठी लायन्स कल्ब सेन्ट्रल जळगाव तर्फे अध्यक्ष जयेश ललवाणी सचिव अविनाश कक्कड, कोषाध्यक्ष दिनेश राका, उपाध्यक्ष मनीष मंडोरे, शिरीष सिसोदिया, पराग लुंकड हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here