जळगाव (संपादक सुनिल पाटील) – गेल्या 22 मार्चपासून कोरोना लॉकडाऊन सुरु झाल्यापासून शहरातील कोचिंग क्लासेस पूर्णपणे बंद आहेत. कोचिंग क्लासेस चालविणाऱ्या संचालकांचे अर्थकारण पूर्णतः कोचिंग क्लासेसवरच अवलंबून असून, त्यांना रोजगार निर्मितीसाठी दुसरे साधन नाही तरी शासनाने अल्पावधीत मुला-मुलींच्या शिक्षणासाठी तरी कोचिंग क्लासेस सुरु करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन कोचिंग क्लासेस असोसिएशनकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
याप्रसंगी कोचिंग क्लासेस असोसिएशनचे अध्यक्ष पंकज नाले, आर सी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शिरसोलीचे किरण बारी, प्रतिभा पाटील, वासुदेव पाटील, शिरीष पाटील, हर्षाली पाटील, विजय वाणी, शिवाजी मराठे, शिरसोलीचे समाधान पाटील, सचिव जिल्हा जनार्दन मगरे उपस्थित होते.








