पनवेल (सहसंपादक ॲड. विष्णू गवळी) – पनवेल महानगरपालिका स्थापन होऊन चार वर्षे झाली तरीही महापालिकेतील पनवेल मधील पत्रकारांसाठी महापालिका प्रशासनाने पत्रकार कक्ष उपलब्ध करून दिला नाही.
1 सप्टेंबर 2020 रोजी पनवेल नगरपरिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर होऊन चार वर्षे पूर्ण झाली आहे. त्या अनुषंगाने अनेक वेळा मागणी होऊनही पत्रकारांना पत्रकार कक्ष उपलब्ध न झाल्याने संतप्त झालेल्या पत्रकारांनी पत्रकार मित्र असोसिएशन च्या नेतृत्वाखाली एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार कक्षाची मागणी केली होती. हीच मागणी पनवेल मधील पत्रकार गेल्या चार वर्षापासून सतत करत आहे पनवेल मधील पत्रकारांच्या योग्य मागणीचा हक्काचा विचार करून पत्रकारांनी केलेल्या लाक्षणिक उपोषणाची गंभीर दखल घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी महापालिका प्रशासनाच्या तुघलकी कारभाराविरोधात थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव संजय कुमार व प्रधान सचिव नगर विकास यांना सविस्तर निवेदन देऊन पनवेल महापालिका आयुक्तांना आदेश देऊन स्वतंत्र पत्रकार कक्ष उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे . ज्येष्ठ शिवसैनिक विष्णू गवळी, सुरेश गोठी व महेश खैरनार उपशहर प्रमुख बेलापूर यांनी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे व संबंधितांना सादर केले आहे. पनवेल मधील पत्रकारांना स्वतंत्र पत्रकार कक्ष उपलब्ध करून देण्याचे देण्याचे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेल्याने पनवेल मधील पत्रकारांना स्वतंत्र पत्रकार कक्ष निश्चितपणे उपलब्ध होईल असा विश्वास जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी व्यक्त केला आहे.







