प्रसिद्ध लेखिका मीना देशपांडे यांचे अमेरिकेत उपचारादरम्यान निधन

मुंबई (हितेश मिस्त्री) – ज्येष्ठ महान साहित्यिक आचार्य अत्रे यांच्या कन्या व प्रसिद्ध लेखिका मीना देशपांडे याचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले आहे. कवी-लेखक महेश केळुस्कर यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत मीना देशपांडे यांच्या निधनाची दु:खद बातमी दिली.
मीना देशपांडे यांना करोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर अमेरिकेतील जॉर्जियामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. अवघ्या चार दिवसांपूर्वी त्यांच्या थोरल्या भगिनी शिरीष पै यांची पुण्यतिथी होती. आचार्य अत्रे प्रतिभा आणि प्रतिमा (संपादित, अत्र्यांच्या लेखनाविषयी अनेक लेखकांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह), अत्र्यांच्या कऱ्हेचे पाणी या आत्मचरित्रानंतरचे पुरवणी चरित्र (खंड ६-७-८), पपा – एक महाकाव्य (सदरलेखन संग्रह), मॅरिलीन मन्‍रो (अनुवादित चरित्र ), मी असा झालो (आचार्य अत्र्यांच्या कऱ्हेचे पाणी ह्या पाच-खंडी आत्मचरित्रातून आणि त्यांच्याच मी कसा झालो या पुस्तकांतून निवडलेल्या उताऱ्यांचे संपादित चित्रमय संकलन, सहसंपादिका शिरीष पै), ये तारुण्या ये (कथासंग्रह), हुतात्मा (कादंबरी), महासंग्राम (कादंबरी) हे त्यांची साहित्य संपदा होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here