पुणे (विशेष प्रतिनिधी अमोल सोळंके) – महा कला मंडलच्या शिष्टमंडळाने पुणे येथे घेतली शरद पवार यांची भेट घेतली.
या भेटीमध्ये प्रामुख्याने संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व कला प्रकारातील एकत्रित झालेल्या 120 संघटनांची माहिती श्री.पवार यांनी घेतली.
कायमस्वरूपी सर्व कलावंताची अडचण सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कामगार कल्याण मंडळाच्या धर्तीवर कलाकार कल्याण मंडळ शासनाने स्थापन करून कलावंतांची अडचणी दूर करण्याचे काम या मंडळामार्फत व्हावे, तसेच सर्व कलावंतांचा आरोग्य विमा शासनाने या मंडळ मार्फत काढावा, तसेच कलावंत साठी घरकुल योजना, आपत्कालीन तातडीची मदत, विविध कला प्रकारात काम करणाऱ्या कलावंतांची नोंद शासनाकडे व्हावी, अशा विविध गोष्टी चा निर्णय शासनाने ताबडतोब घेण्यासाठी मा. पवार साहेबांनी या आठवड्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री, आणि महा कला मंडलचे प्रतिनिधी यांची संयुक्त मिटिंग लावण्याची सूचना मुख्यमंत्री कार्यालयाला दिल्या.
शरद पवार यांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे, महाकलामंडळाच्या शिष्टमंडळास अतिशय आनंद झाला असून, लवकरच ही मीटिंग होईल अशी अशा आहे, या शिष्टमंडळात महा कला मंडलचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, जयमाला काळे इनामदार, पूजा पवार साळुंखे हे उपस्थित होते.







