महावितरणकडून म्हैसमालकाला मदत मिळण्यासाठी काँग्रेसतर्फे निवेदन

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे खुल्या डि.पी,ला चिकटून जाफराबादी या जातीची दुध देणारी म्हैस मृत झाली या गोष्टीला १० दिवस उलटुन गेल्यावरही महावितरण कडून १ रुपयाची मदत चंद्रकांत रविंद्र धनगर या गरीब मालकास मिळालेला नाही तरीही या संदर्भात लवकरात लवकर पाठपुरावा करुन तात्काळ मदत देण्यात यावी साठी तालुका काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना तालुकाध्यक्ष – मनोज चौधरी , प्रमोद घुगे , भाऊसाहेब सोनवणे, धनराज जाधव, भिकन सोनवणे व म्हैस मालक चंद्रकांत धनगर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here