वर्धा जिल्हा शिक्षण समन्वय समितीच्या आंदोलनाला यश

वर्धा (प्रतिनिधी मनोज बाचले) – सोमवार (दि. 07 सप्टेंबर) समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची त्यांचे दालनात भेट घेतली कोविड- 19 च्या कामातील शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालायसमोर जमलेल्या शिक्षक समुदायाचा असंतोष पाहून त्यांनी तातडीने त्यांचे दालनात सर्व अधिकाऱ्यांची सभा बोलाविली. सभेला सचिन ओम्बासे मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. वर्धा, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, सुरेश बगडे उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शासन निर्णय दि.24 जून व 17 ऑगस्ट 2020 नुसार शिक्षक / शिक्षिका / शिक्षकेत्तर कर्मचारी यांना कोविड- 19 च्या कामातून तात्काळ कार्यमुक्त करावे अशी जोरदार मागणी केली. त्यावेळी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी सदर शासन निर्णयाप्रमाणे शिक्षकांना कोविड- 19 च्या कामातून कार्यमुक्त करावे किंवा कसे याबाबत शासनाशी तात्काळ पत्र व्यवहार करून आठ दिवसाचे आत पुन्हा समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांना सभेला बोलावून त्याबद्दल माहिती देण्याचे मान्य केले.
यानंतर समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाचे मार्गदर्शन येईपर्यंत कोविड-19 च्या कामातील समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी केली त्यावेळी गुगल फॉर्म मध्ये कुटुंब प्रमुखाचे नाव व भ्रमणध्वनीची नोंद दिलेल्या लिंक वर भरण्याचे आदेश मागे घेण्यात आलेले आहे त्यामुळे आता प्रगणकांना गुगल फॉर्ममध्ये माहिती भरण्याची गरज राहिलेली नाही, अतिसंवेदनशील भागात सर्व्हेक्षणाचे काम करणाऱ्या शिक्षिकांना तात्काळ कार्यमुक्त करणार. यासाठी SDO यांनी दुपारी 4.00 वाजता समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत सभा घेऊन चर्चा करण्यात येईल असे सांगितले. व त्या सभेमध्ये तुमच्या इतर समस्या सोडविल्या जातील असे आश्वस्त केले. त्यानंतर समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जमलेल्या शिक्षक समुदायासह नगर परिषद वर्धा चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पालीवाल यांचे दालनात त्यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार गुगल फॉर्ममध्ये माहिती भरण्याची आता गरज नाही हे स्पष्ट केले. त्याचवेळी त्यांना SDO यांचा 4.00 वाजताच्या सभेच्या संदर्भाने दूरध्वनी आल्यामुळे बाकी सर्व समस्यांवर 4.00 वाजता SDO यांच्या दालनात चर्चा करण्याचे ठरले. त्यानंतर दुपारी 4.00 वाजता समन्वय समितीच्या शिष्टमंडळासोबत SDO यांचे दालनात CEO नगर परिषद वर्धा यांचे उपस्थितीत सभा संपन्न झाली.
या सभेत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले. रविवारी व इतर शासकीय सुट्यांचे दिवशी सर्व्हेशनाचे काम करण्याची गरज नाही असे आदेश झाले, ज्या शिक्षिका अतिसंवेदनशील भागात सर्व्हेक्षणाचे काम करीत आहे त्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे ठरले., मागील तीन महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून जे शिक्षक/ शिक्षिका/ शिक्षकेत्तर कर्मचारी कोविड-19 चे कामात आहेत त्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश सर्व BDO व तहसीलदार यांना देण्याचा निर्णय झाला, टप्याटप्याने प्राधान्याने मनुष्य बळाच्या उपलब्धतेनुसार शिक्षिकांना सर्व्हेक्षणाच्या कामातून कार्यमुक्त करण्याचे ठरले व त्यानंतर टप्प्याटप्याने दीर्घकाळापासून कोविड- 19 च्या कामातून मनुष्यबळाच्या उपलब्धतेनुसार सर्व शिक्षकांना सुद्धा कार्यमुक्त करण्याचे ठरले, स्वयंस्फूर्तपणे मानवीय दृष्टीकोनातून स्वेच्छेने काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या कर्मचारी / NGO यांना कोविड-19 च्या कामात सहभागी होण्याचे आवाहन करणार, प्रशासन आपल्या समस्यांकडे जातीने लक्ष देत असल्यामुळे व त्या सर्व समस्या तातळीने सोडविण्याचे आश्वस्त केले असल्यामुळे आपण सर्वांनी आपणाला कोविड-19 च्या कामातून कार्यमुक्त करेपर्यंत संयम ठेवावा असे समन्वय समितीच्या वतीने आपणा सर्वांना आवाहन करण्यात येत आहे, स्वेच्छेने कोविड-19 चे काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी समन्वय समितीकडे किंवा SDO यांचेकडे आपले नाव व मोबाईल नंबर कृपया द्यावा व कोरोनाच्या महामारी पासून व होणाऱ्या संसर्गापासून जनतेला वाचविण्यासाठी आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून सहकार्य करावे अशी वर्धा जिल्हा शिक्षण समन्वय समिती व प्रशासनातर्फे नम्र विनंती करण्यात येत आहे.
आजचे वर्धा जिल्हा शिक्षण समन्वय समितीचे आंदोलन हे व्ही. यु. डायगव्हाणे अध्यक्ष वर्धा जिल्हा शिक्षण समन्वय समिती यांचे मार्गदर्शनात घेण्यात आले यावेळी सतीश जगताप, रवीबाबू शेंडे, जयप्रकाश थोटे, अजय वानखेडे, नूरसिंग जाधव, अरुण हर्षबोधी, पदमा तायडे, मंगेश शहाकार, पांडुरंग भालशंकर, शशिकांत वैद्य, प्रवीण भोयर, चंद्रकांत ठाकरे, सुरेश रोठे, प्रमोद खोडे, मनोहर बारस्कर, किशोर सोनटक्के, रामेश्वर लांडगे, श्याम चित्रकार, सुरेशकुमार बरे , महेंद्र सालंकार, शशांक हुलके, सुनील धवने, प्रवीण देशमुख, रवींद्र वाघमारे, इंद्रजित ढोले, प्रकाश दुबे, सुधाकर वाघमारे, अशोक डायगव्हाणे, नरेश बांगडे, विजय जुगनाके, सागर मसराम, रितेश निमसडे, मनीषा साळवे, मेरी साळवे, शुभांगी चिकटे, गिरीश बोरकर, नितीन ठाकरे, दिनेश नौकरकर, महेंद्र झाडे, धर्मेश झाडे, करुणा हेगे, प्रीती लिडबे, सौ सावळकर, सौ पांडे, सौ सकंडे, सौ करडेकर, सौ वाघमारे, सौ पाटील, सारीखा पारधी, सौ डेकाटे, नितीन खराबे, दिनेश वाणी, सौ कविता कुंभारे, स्मिता ढाकणे, नंदिनी कुमरे, रत्नमाला किनाके, तारा वाघ, कांचन लोखंडे, शिला वरभे, रंजना बोधाने, ज्योत्स्ना राऊत, उज्वला इंगळे, विद्या जगताप, विद्या हिवरे, सुनीता भुरे, रूपा कडू, भावना फुटाणे, कुंदा उघडे, कैलास नागरे, ज्योत्स्ना कार्लेकर, शुभांगी सातपुते, अश्विनी भालेराव, वासंती अर्जापुरे, नंदा नांदेडकर, सुनीता सुपे, साधना कोल्हे, अपर्णा सोनकुसरे, सुनीता धोटे, सौ भिसे, लता हेडावू, मनोरमा पंचभाई, संगीता मुंधडा, अश्विनी भोयर, किरण पांडे,उषा झामरे, सुनीता चकवे, कांचन देशमुख, सुषमा बाळसराफ, सुनीता चाफले, अरुना जक्कनवार, अनिता बाजपेयी, नीता ढोणे, व्ही. जे. श्रीरामे, सीमा खेडकर, चारुलता येळणे, वैशाली सावळकर, लता मोकलकर, सुवर्णा थूल, प्रज्ञा पाटील, वंदना जोगे, जयश्री खाडे, अपर्णा देवढे, स्वाती काळे, निशा कुकडे, किरण पांडे, सुनील ढाले, रुपाली नरड, जया गाडगे, कांचन गावंडे, भावना फुटाणे, अनिता पोहरे, सौ डी. एम. बोरूटकर, सौ एस. डी. शेळके, सौ. आर. रपाटे, सरिता वाघमारे, सौ. एस. पी. भीमटे, सौ. नीलिमा मिरझापुरे, सोनाली नांहोरे, उषा मेहरे, सौ हजारे, सौ श्रावणे, अंजुम खान, योगीता बोंडे, सवित्री नाखले, सौ आत्राम इत्यादी शेकडो शिक्षक/ शिक्षिका/ शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here