८० लोकांची स्वॅब तपासणी : १६ कोरोनाबाधित आढळले
जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – जळगाव शहर महानगरपालिका व छत्रपती शिवाजी फाऊंडेशन जळगाव
यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील आशाबाबा नगरातील पंडितराव कॉलनी येथील हनुमान मंदिराजवळ वैद्यकिय तपासणी शिबिर घेण्यात आले.
या कॅम्पमध्ये ८० लोकांची वैद्यकिय तपासणी करुन त्यांच्या स्वॅब तपासला असता, त्यातील १६ कोरोनाबाधित आढळून आले. त्यांना पुढील उपचारांसाठी वैद्यकिय कर्मचारी व डॉक्टरांनी योग्य ते मार्गदर्शन व सहकार्य केले. हे वैद्यकिय तपासणी शिबिर घेतल्याबद्दल आशाबाबा नगरातील राहिवाश्यांनी आभार मानले आहे. या तपासणी शिबिराला नगरसेवक सचिन पाटील यांनीही उपस्थिती देवून रुग्णांचे मनोधैर्य वाढवले, त्याबद्दल नगरवासियांनी त्यांचेही आभार मानले आहेत.








