जळगाव जिल्ह्यात ९६१ कोरोनाबाधितांनी केली कोरोनावर मात

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल आज (दि.८) प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यात ८३५ कोरोनाबाधित आढळून आले. त्यात सर्वाधिक जळगाव शहरात १९९ कोरोनाबाधित आढळले असून, त्याखालोखाल अमळनेर, पारोळा आणि एरंडोल तालुक्यातही कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. आनंदाची गोष्ट अशी की, आज प्रथमच आजवरचे सर्वाधिक ९६१ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यपरिस्थिीत ९ हजार २५५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
आज आढळलेल्या ८३५ कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर-१९९, जळगाव ग्रामीण-३५, भुसावळ-३४, अमळनेर-१०५, चोपडा-५१, पाचोरा-५, भडगाव-११, धरणगाव-८, यावल-३९, एरंडोल-७५, जामनेर-६२, रावेर-८, पारोळा-९५, चाळीसगाव-८०, मुक्ताईनगर-२०, बोदवड-७ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील १ असा समावेश आहे.
आज अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३४ हजार ४५३ इतकी झाली असून आजवर २४ हजार ३०४ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान आज १७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून मृतांचा एकूण आकडा ८९४ इतका झाला असल्याची माहिती, शासकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here