बुलंद पोलीस टाइम्स आणि महाराष्ट्र पोलीस गृहरक्षक दल यांच्या संयुक्त विद्यमाने देवदूत सन्मानाचे वितरण

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : बुलंद पोलीस टाइम्स आणि महाराष्ट्र पोलीस गृहरक्षक दल यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यातील विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या समाजसेवक, डॉक्टर ,नर्स, प्राणीमित्र, वकील, साफसफाई कर्मचारी, शिक्षक, आणि प्राध्यापक, ठाणे महानगर पालिका अधिकारी व कर्मचारी तसेच,पोलीस खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांना बुलंद पोलीस टाइम्स मुख्य संपादक सुनील पाटील आणि महाराष्ट्र पोलीस रक्षक संघर्ष समिती संचालक सिद्धार्थ जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार कोरोना कालावधीमध्ये अतिशय महत्वाचे मौल्यवान कामगिरी करणारे यांना देवदूत सन्मान वितरीत करण्यात आले आहेत.

devdoot-sanmandevdoot-purskar

या पुरस्कारांमध्ये डॉ. अमोल गीते ( सिद्धिविनायक हॉस्पिटल), आर. एन. तिवारी (ज्ञानोदय विद्या मंदिर), हरेश गोगारी (के.वी.सामाजिक संस्था संचा), प्रमोद जाधव भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी सचिव महाराष्ट्र प्रदेश, एकनाथ भोईर, कार्यसम्राट नगरसेवक ठा.म.पा., गणेश ताटे अध्यक्ष -भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश, ना.एकनाथ शिंदे ( पालक मंत्री ठाणे जिल्ह्य ), आमदार निरंजन डावखरे, चित्राताई वाघ भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश, श्वेता शालिनीजी यांचा सन्मान करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here