नालासोपारा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन पुस्तकवाटपाने साजरा

नालासोपारा (महाराष्ट्र उपसंपादक सुनिल तांबूसकर) : येथे रविवारी दि. ७ नोव्हेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिनानिमित्त धम्म पुस्तके वाटप करण्याचा कार्यक्रम साजरा झाला.

यावेळी माजी नगरसेवक नरेश जाधव आणि कलाकार डान्स डायरेक्टर अमोल गायकवाड आणि नालासोपारा येथील सभासद, महीला आणि पुरूष मंडळी उत्साहाने उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे थोरले बंधू बाळाराम रामजी आंबेडकर यांची कन्या सखुबाई तांबुसकर यांचे पुत्र गंगाधर तांबुसकर आणि त्यांचा मुलगा सुनिल गंगाधर तांबुसकर बाबासाहेबांचे पणतू आले होते.

आंबेडकर चळवळीतील भारतीय बौद्ध महासभाचे अध्यक्ष ईकमटॅकस डिपार्टमेंटमध्ये कामाला असलेले आणि दानशूर संदेश सावळाराम जाधव साकेडीकर आले होते. त्यांच्याबरोबर घाटकोपरचे समाज कार्यकर्ते आणि चित्रपट कलाकार किशोर बर्वे ही उपस्थित होते. तसेच, नालासोपारा मध्ये रहाणारे धडाडीचे कार्यकर्ते लेखक दिग्दर्शक संजय गंगाराम जाधव हया सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here