मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) : सायन कोळीवाडा येथील कोकरी आगर, महाराष्ट्र नगर झोपडपट्टी येथे आज सकाळी तीन घरे कोसळली. ही घटना सकाळी आठ वाजताच्या दरम्यान घडली.
घटनेची माहिती मिळाल्याबरोबर अग्निशमन विभाग आणि अँटॉप हिल पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ९ जखमींना बाहेर काढले. जखमींना सायन रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
तिन्ही घरांपैकी एकात रेशन दुकान, एकात भंगार दुकान आणि तिसऱ्या घरात मिठाचे दुकान होते. रेशन दुकानावर दुरुस्तीचे काम चालू होते. रेशन दुकानाच्या वरती दोन माळे होते. भंगार दुकानाच्या वर २ माळे होते. मिठाच्या दुकानाच्या वर १ माळा होता.






