अभिनेत्री पूनम पांडेच्या पतीला ३ दिवसांची पोलीस कोठडी

poonam pandey

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : अभिनेत्री पूनम पांडे हिने पोलिसात पतीविरोधात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यावरून तिचा पती सॅम अहमद बॉम्बे याला काल संध्याकाळी वांद्रे पोलिसांनी अटक केली होती. पूनमला तिच्या पतीने मारहाण केली केली यात ती जखमी झाली होती त्यामुळे तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सॅमला आज न्यायालयात हजर केले होते, यावेळी त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुंबई पोलीस अधिकाऱ्याने माहितीनुसार, अभिनेत्री पूनम पांडेच्या तक्रारीवरून पती सॅम अहमद बॉम्बे याला अटक करण्यात आली आहे, अभिनेत्रीने आरोप केला आहे की पती सॅम त्याची पहिली पत्नी अलविरा हिच्याशी बोलत होता. या चर्चेदरम्यान दोघांमध्ये वादावादी झाली. रागाच्या भरात पतीने भिंतीवर डोके आपटले आणि तिच्यावर जोरदार वार करून तिला जखमी केले. अभिनेत्रीच्या डोक्याला, डोळ्यावर आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे,

वांद्रे पोलिसांनी 326 सह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आज आरोपी सॅमला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here