अक्कलकोट(तालुका क्राईम रिपोर्टर वैदपाशा तडमुड) : पिपल्स डेव्हलपमेंट फाउंडेशन ( महा. राज्य ) व मैंदर्गी नगरपरिषद मैंदर्गी यांच्या संयुक्त विद्यमाने व बुधाराणी हॉस्पिटल, पुणे यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने आज मैंदर्गी नगरपरिषद येथे नेत्र तपासणी शिबीर अंतर्गत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया ,काचबिंदू शस्त्रक्रिया,तिरळेपणा, व कमी किमतीमध्ये चष्मे वाटप अशा अनेक डोळ्यांच्या समस्या वर मोफत उपचार व मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे हस्ते दिप प्रजवलंन करून, आलेल्या पाहुण्यांचे सत्कार करून शिबिराला सुरुवात करण्यात आले.
शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नगरसेवक सिद्धाराम बिराजदार यांच्या पुढाकाराने हे शिबीर आयोजित करण्यात आला होता.या शिबिराचे उद़्घाटन अक्कलकोट तालुका भाजपा महिला अध्यक्ष सौ. सुरेखा होलीकट्टी मॅडम,मैंदर्गीचे माजी नगराध्यक्ष तुकप्पा नागुर यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी गट नेते किरण केसूर,समाजसेवक महेश शावरी,नगरसेवक लक्ष्मण बुरुड,नगरसेवक विठ्ठल आरेनवरू,नगरसेवक जैनोदिन हारकुड, गणेश गोब्बूर आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय डोकं सेफ्टी इनस्पेक्टर-सोमशेखर बाजारमठ, ऍड.विश्वा पाटील,डॉ.सुधीर सिंदगी सर, मकानदार चाचा,राज शावरी, आमिर मुल्ला सर,बसणा काका देगाव,इम्रान तडमुड,नागेश भंगर्गी यांनीही शिबिराला भेट दिली.
नागरिकांनी या शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. आज दुपार पर्यंत ८९ पेक्षा अधिकांची डोळे तपासणी करण्यात आली. त्यापैकी तब्बल ३२ लोकांची मोतीबिंदू ऑपरेशन साठी आणि ३६ लोकांची चष्म्याचा नंबर लागला असून येत्या १२ नोव्हेंबर रोजी चष्म्या देण्यात येणार आहे. नेत्र तपासणी करिता आरोग्य विभागाचे डॉ. माया हजारे, पीपल डेव्हलपमेंट फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष दिपक काकडे,ज्ञानेश्वर गुरव सर,दिनेश जैन, आदींचे सहकार्य लाभले. तर शिबिराच्या यशस्वीतेकरिता गणेश गोब्बूर,अमित बंडे,अनिल बिराजदार,समर्थ मुलगे, कर्मचारी दवलप्पा कोळी,प्रकाश मनिकडे,श्रीधर मनिकडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.







