कारंजा (प्रतिनिधी हाफीज खान) : कारंजा-संपूर्ण महाराष्ट्रात एस टी कर्मच्याऱ्यांचा बेमुदत संप सुरु आहे.दिनांक ०७ नोव्हेम्बरपासून कारंजा आगारातील एस टी कर्मच्याऱ्यांनी त्यांच्या रास्त मागण्या साठी संप पुकारला आहे.एस टी कर्म.च्या रास्त मागण्या मान्य कराव्यात अशी विनंती सामाजिक समता प्रबोधन मंचच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना कारंजा आगार व्यवस्थापक मुकुंद नाव्हकर यांचे मार्फत निवेदना व्दारे करण्यात आली.
याबाबत बाबत सविस्तर वृत्त असे की, कारंजा आगारातील एस टी कर्म.एस टी कर्म.चे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण करावे,वेतन वाढ,वेतन श्रेणी व इतर भत्ते राज्य कर्म.प्रमाणे मिळावे या करीता दिनांक ०७ नोव्हेम्बर पासून बेमुदत संप पुकारला आहे.त्यांच्या रास्त मागण्या मान्य कराव्यात, यासाठी आज सामाजिक समता प्रबोधन मंच, शेतकरी जनआंदोलन समिति,समाज क्रांती आघाडी यांचे तर्फे आंदोलनकारी एस टी कर्म.यांना भेट देऊन त्यांचे सान्तवन केले आणि कारंजा आगार प्रमुख मुकुंद नाव्हकर यांचे मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदना द्वारे विनंती केली आहे.
सदर कार्यक्रमाचे संचलन विजय भड यांनी केले.यावेळी शेतकरी चळवळीचे गजानन अमदाबादकर, समाज क्रांती आघाडी चे हंसराज शेंडे,सामाजिक समता प्रबोधन मंचचे ज्ञानेश्वर खंडारे,विनायक पदमगिरवार,देवानंद बोन्ते,रमेश नाखले, देवानंद तिडके,शाम तायडे, भगवान राउत,देविदास नांदेकर,अमोल लूलेकर,शाम घारू,इशांत देशमुख आदि उपस्थित होते.






