कारंजा (तालुका प्रतिनिधी हफीज खान) : एस टी चे सरकार मध्ये विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी दि. ७ नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाला वाशिम जिल्हा काँग्रेस सेवादल कारंजा लाड शहर च्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. एस टी आगाराच्या आवारात बेमुदत संपावर बसलेल्या कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणुन कांग्रेस सेवादलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
वाशिम जिल्हा काँग्रेस सेवादलाचे जिल्हा समन्वयक अॅड संदेश जैन जिंतुरकर ह्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की गेल्या 2/3 दिवसांपासून एस टी चे कर्मचारी एस टी चे सरकार मध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी स्वयंस्फुर्ती ने बेमुदत संपावर गेले आहे. त्यांची ही मागणी रास्त व मान्य करण्याजोगे असुन एस टी चे विलीनीकरण झाल्यास नवीन वेतनश्रेणी , इतर सर्व सोयी सुविधा व भत्ते लागु होऊन कर्मचारी आपले पुढील आयुष्य तरी सुख समाधानाने जगु शकेल.आज एस टी कर्मचाऱ्यांचे वेतन अत्यंत अल्प असुन सोयी सुविधा सुध्दा प्राप्त होत नाही आहे अश्या विपरीत परिस्थितीतही कर्मचारी मात्र आपला जीव धोक्यात घालून बस मध्ये बसलेल्या ५५ प्रवासांना सुखरुपपणे नेआण करण्याचं काम अगदी चोखपणे पार पाडत आहे. अश्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्वरीत पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष नाना पटोले व वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष अमित भाऊ झनक ह्यांच्या नेतृत्वातील कांग्रेस पार्टी कटिबद्ध असल्याचे मत संदेश जैन जिंतुरकर ह्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त करून आज पर्यंत आत्महत्या केलेल्या एस टी कर्मचार्ऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली काँग्रेस सेवादल चे वतीने अर्पण करण्यात आली.
यावेळी उदयसिंह ठाकुर सर ह्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. एस टी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी वाशिम जिल्हा काँग्रेस सेवादल चे सरचिटणीस अब्दुल राजिक शेख , रामबकस ढेंडुळे , राजकुमार लाहोटी , लियाकत भाई मुन्नीवाले व आनंद जोशी उपस्थित होते.







