गुलाबराव देवकर यांनी स्वीकारला जे.डी.सी.सी.बँक अध्यक्षपदाचा कार्यभार

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) : येथील जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.ची अध्यक्ष – उपाध्यक्षपदाची निवड शुक्रवारी (दि.३) रोजी पार पडली. यावेळी अध्यक्षपदी गुलाबराव देवकर व उपाध्यक्षपदी शामकांत सोनवणे यांची निवड झाली.

आज शनिवारी (दि.४) सकाळी ११ वाजता अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी जेडीसीसी बँकेत येऊन श्री छत्रपती शिवाजी महाराज व बँकेचे माजी चेअरमन सहकारमहर्षि प्रल्हादराव पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. बँक इमारतीत असलेल्या पुतळ्यांनाही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

jdcc-bankgulabrao-deokar-jdcc-bank

त्यानंतर बँकेच्या अध्यक्ष दालनात येऊन बँकेच्या कामकाजाविषयी कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्याकडून आढावा घेतला. याप्रसंगी बँकेचे माजी संचालक सदस्य प्रशांत चौधरी, राम पवार, विलास पाटील व जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते व बँक पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here