नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथील शासकीय आश्रम शाळा येथे डीबीटी
योजनेवर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी डीबीटी अभ्यास गटाचे अध्यक्ष ॲड. पद्माकर वळवी हे होते तर डीबीटी योजनेबाबत विद्यार्थी,पालक, मुख्याध्यापक, अधीक्षक,विविध सामाजिक संस्था,संघटना व लोकप्रतिनिधी यांची मते जाणून घेण्यासाठी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहादा तालुक्यातील सर्वच आश्रमशाळा व वस्तीगृहाच्या विद्यार्थी,पालक यांना परीसंवादात सहभागी करून घेण्यात आले होते.डीबीटी अभ्यास धोरण समिती अभ्यास गटाचे अध्यक्ष अँड. पद्माकर वळवी यांच्या हस्ते याहा मोगी मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .यानंतर परिसंवादाला सुरुवात करून डीबीटी योजना सुरू झाल्यापासून ते आज पावतो त्यात झालेल्या बदलांबाबत व निर्माण झालेल्या अडचणी व समस्या बाबत चर्चा करून माहिती जाणून घेतली यासोबतच डीबीटी योजनेमुळे विद्यार्थ्यांच्या वेळ वाया जातो का त्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो का असे प्रश्न विचारून विद्यार्थ्यांना व पालकांना सहभागी करून घेत प्रत्यक्ष उपस्थित पालकांना व विद्यार्थ्यांना भेटून प्रश्नावलीच्या माध्यमातून व लेखी स्वरूपात त्यांची मते जाणून घेतली.








