रावेर (प्रतिनिधी) – स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषि महाविद्यालय,जळगाव जामोद येथील अंतिम वर्षातील विद्यार्थी योगेश भानुदास पाटील यांनी‛ग्रामीण कृषि कार्यानुभव’ या कार्यक्रमांतर्गत निकृष्ट कोरड्या चाऱ्यावर प्रक्रिया करून त्याचे उपयुक्त चाऱ्यात कसे रूपांतर करावे याविषयी अंतुर्ली ता.मुक्ताईनगर येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. दूध-दुभती गाईगुरं शेतकऱ्याची संपत्ती म्हणून ओळखली जातात.संकटाच्या काळात त्यांच्यापासून मिळणारे आर्थिक उत्पन्न शेतकऱ्याच्या अडचणींवर फुंकर घालण्याचे काम करते.त्यामुळे या जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणे शेतकऱ्यांसाठी क्रमप्राप्त असते.जनावरांच्या आरोग्यात त्यांना खाऊ घातला जाणारा ‛चारा’ हा अत्यंत महत्वाचा घटक आहे.गाईगुरांना शेतकरी जो कोरडा चारा खाऊ घालतात तो त्यांना फारसा उपयोगी ठरत नाही.याउलट त्यावर युरिया,मीठ,गुळाचे पाणी,न्यूट्रिएंट मिक्चर, इ.घटकांची प्रक्रिया केल्यास ते अधिक उपयुक्त ठरते.प्रक्रिया केलेल्या चाऱ्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असते.त्यामुळे जनावरांना त्याचा अधिक फायदा होतो.विशेष म्हणजे या प्रक्रियेसाठी लागणारे घटक बाजारात अल्पदरात सहज उपलब्ध आहेत.कृषिदूतांनी ही चारा प्रक्रिया कशी करावी, यासाठी लागणारे घटक किती प्रमाणात घ्यावे,प्रक्रिया केलेल्या चाऱ्याचा वापर कसा करावा,इ,.बाबी शेतकऱ्यांना समजून सांगितल्या.यावेळी शेतकरी बाळू पाटील,भानुदास पाटील,रामभाऊ शिवारे,अक्षय पाटील,निखिल पाटील,प्रतीक देशमुख,आदि उपस्थित होते.कृषिदूतांना या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषि महाविद्यालय जळगाव जामोद येथील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.योगेश गवई,कार्यक्रम अधिकारी प्रा.अविनाश आटोळे,कार्यक्रम समन्वयक प्राध्यापिका व्ही.टी. कपले,विषय तज्ज्ञ प्रा.महेश आखूड यांचे मार्गदर्शन लाभले.
Home राज्य उत्तर महाराष्ट्र अंतुर्ली येथे कृषीदुत योगेश पाटील यांनी केले चारा प्रक्रियेविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन







