अलिबाग येथे पत्रकारांची कोविड मोफत तपासणी

पनवेल/अलिबाग (प्रतिनिधी) सोगावकर – कोविड 19 मध्ये सतत कार्यरत असताना घरामधून बाहेर पडल्यावर आपली काळजी घेणे याबाबत सौभाग्यवती जयश्री हिच्या सूचनांचे पालन करता करता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना रुग्णालयाची 108 ची मदत नेहमीचे झाले आहे, अशात अलिबाग तालुक्यात कोरोना रुग्ण वाढू लागले, त्यामध्ये पुण्याच्या व रायगडच्या पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने माझा मुलगा,मुलगी आणि हितचिंतक मित्र यांचे सावधानतेचे इशारे दररोज येऊ लागले, यामध्ये काळजी घेत असलो तरी आपल्यामुळे इतरांना त्रास नको, म्हणूनच महाराष्ट्राच्या माहिती जनसंपर्क खात्याच्या मंत्री तथा पालकमंत्री अदिती तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत पत्रकारांची मोफत एंटीजन टेस्ट करण्याचे आदेश दिल्याने सिव्हिल सर्जन डॉ. सुहास माने यांनी पत्रकारांची तातडीने टेस्ट करा, असे आदेश दिल्याने आज जिल्हा रुग्णालयात मी टेस्ट साठी गेलो असता डॉ.संदेश म्हात्रे, डॉ. अमोल खरात, लॅब टेक्निशियन रुचिता पालेकर, कामिनी पाटील, अंकिता शीर यांनी तत्परतेने माझी टेस्ट केली आणि अर्ध्या तासाने डॉक्टरांनी सुहास्यवदनाने सांगितले “पत्रकार निगेटिव्ह आहात, अभिनंदन!!
आणि समोर असलेले अनेक समाजसेवक,नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आणि माझ्या चेहऱ्यावर आनंद झाला, आपणही covid-19 मध्ये काम करीत आहोत, हे करण्यासाठी एक नवा हुरूप मिळाला. रायगड जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधू-भगिनींना माझी कळकळीची विनंती आहे की आपण ही टेस्ट लवकरात लवकर करून घ्यावी, या महत्त्वाच्या कामाबाबत नामदार आदिती तटकरे पालकमंत्री रायगड, जिल्हा रुग्णालय अलिबाग यांचा मी आभारी आहे.
—– रायगड भूषण ज्येष्ठ पत्रकार जयपाल पाटील आपत्ती व सुरक्षा तज्ञ

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here