मुंबई (प्रतिनिधी अकबर मकरानी) – धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व अभिजीत राणे युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांनी दि. 9 सप्टेंबर, 2020 रोजी दिंडोशी पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री धर्नेंद्र कांबळे यांची भेट घेतली.या वेळी दिंडोशी विभागातील संघटित व असंघटित कामगारांचे प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली.
कोरोना लाॅकडाऊनच्या दरम्यान दिंडोशी पोलिस पोलिस ठाणेचा माध्यमातुन केलेल्या कार्याबद्दल प्रदीर्घ चर्चा करण्यात आली तसेच दिंडोशी पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री धर्नेंद्र कांबळे यांचा हया कार्याबद्दल धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व अभिजीत राणे युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व अभिजीत राणे युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांच्या तर्फे दिंडोशी पोलिस ठाण्यातील कर्मचा-यांसाठी सॅनिटायजर बाॅटल्सचे वाटप करण्यात आले. या वेळी धडक माथाडी जनरल कामगार युनियनचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री विनय डोळस उपस्थित होते.







