कोरोनाचा नवा उच्चांक; ११७४ पॉझिटिव्ह
सांगली (प्रतिनिधी स्वप्निल कारेकर) – जिल्ह्याचा मृत्यूदर जगात आघाडीवर आहे. आजअखेर कोरोनाने 735 जणांचा मृत्यू झाला. अवघ्या 15 दिवसांत मृत्यूचे प्रमाण दुप्पट झाले असून, आज सांगली जिल्ह्याचा मृत्यूदर 3.82 टक्क्यांपर्यंत गेला आहे. बरे होण्याचे प्रमाण तर 15 दिवसांत 66 टक्क्यांवरून 52.49 टक्क्यांवर आले आहे. रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्सचे बेड मिळेनात. तरीही पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी प्रशासन ढिम्म असा कारभार सुरू आहे. अद्याप जम्बो हॉस्पिटल आणि उपचाराच्या नियोजनाचे कागदी खेळ सुरूच आहेत.
वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करताना यापूर्वीच मोठे जम्बो हॉस्पिटल, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्सची उपलब्धता करणे आवश्यक होते. पण ते केले नव्हते. दररोज रुग्णसंख्येचा आकडा आता हजाराच्या घरात पोहोचला आहे. रोज 35-40 जणांचे मृत्यू होत आहेत. गेल्या 15 दिवसांत मृत्यूची संख्या 383 वरून तब्बल 735 वर गेली आहे. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील 327, शहरी भाग (महापालिका वगळून) 108 आणि ग्रामीण भागातील 300 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. कोरोना रूग्ण बरे होण्याच्या बाबतीत जिल्हा राज्यात 26 वा आहे. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडची गरज मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे.
रुग्ण व नातेवाईकांच्या हालअपेष्टा सुरू आहेत. पालकमंत्र्यांनी 75 व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून दिल्याचे जाहीर केले. परंतु दररोज मृत्यूचे आणि रुग्णसंख्येचे प्रमाण पाहता व्हेंटिलेटर्स तोकडेच पडत आहेत. एकूण ही परिस्थिती पाहता तातडीने जिल्हाधिकार्यांनी शासनपातळीवर प्रयत्न करून गतिमान पद्धतीने किमान हजार-दोन हजार बेडचे हॉस्पिटल उभारायला हवे होते.
जिल्ह्यात गुरुवारी 1 हजार 174 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील 402 व्यक्तींचा समावेश आहे. एका दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने व्यक्ती पॉझिटिव्ह येण्याचा हा नवा उच्चांक आहे. जिल्ह्यातील 27 आणि परजिल्ह्यातील 2, अशा एकूण 29 व्यक्तींचा मृत्यू झाला. उपचाराखालील 929 व्यक्ती अतिदक्षता विभागात आहेत. गुरुवारी 447 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या.
जिल्ह्यात गुरुवारअखेर एकूण पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या 20 हजार 434 झाली आहे. गुरुवारअखेर एकूण 10 हजार 747 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. सध्या 8 हजार 925 व्यक्ती उपचाराखाली आहेत. त्यापैकी 929 व्यक्तींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यातील 772 व्यक्ती ऑक्सिजनवर, 96 व्यक्ती नॉन इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर, 54 व्यक्ती हायफ्लो नेझल ऑक्सिजनवर, आणि 7 व्यक्ती इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर आहेत. उपचाराखालील 6 हजार 95 व्यक्ती होम आयसोलेशनमध्ये आहेत. गुरुवारअखेर एकूण मृत व्यक्तींची संख्या 762 झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.सांगली महापालिका क्षेत्रात गुरुवारी 402 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या. यामध्ये सांगलीतील 299 आणि मिरजेतील 103 व्यक्तींचा समावेश आहे.
तासगाव तालुक्यात बोरगाव, चिखलगोठण, चिंचणी, मणेराजुरी, सावर्डे, तुरची, राजापूर, डोंगरसोनी, कचरेवाडी, हातनूर, खुजगाव, सावळज, आळते येथील प्रत्येकी 1 व्यक्ती, कवठेएकंद 10, नागाव (नि) 4, वासुंबे 7, येळावी 2, कुमठे 6, वायफळे येथील 2 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या. कवठेमहांकाळ येथील 17, गर्जेवाडी 10, तिसंगी 8, हिंगणगाव 5, नागज 4, रांजणी 3, लंगरपेठ 2, मळणगाव 2, देशिंग 2, नांगोळा 1, आरेवाडी 2 आणि घाटनांद्रे येथील 1 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली. खानापूर तालुक्यात विटा येथील 44, पळशी 1, खानापूर 1, बलवडी (खा.) 8, जाधववाडी 2, सुलतानगादे 1, मोही 2, तांदळगाव 1, साळशिंगे येथील 1 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली. वाळवा तालुक्यात इस्लामपूर 24, आष्टा 13, जुनेखेड 2, धोत्रेवाडी 1, बोरगाव 8, तुजारपूर 2, वशी 1, वाळवा 5, कुरळप 5, फार्णेवाडी 2, कामेरी 10, कारंदवाडी 1, गोटखिंडी 1, बावची 1, नवेखेड 7, ताकारी 1, शिरटे 1, कासेगाव 4, पेठ 4, रेठरेधरण 3, येडेनिपाणी 3, येलूर 1, कुंडलवाडी 4, तांदूळवाडी 1, करंजवडे 6, कुरळप 3, ऐतवडे खुर्द 1, वशी 3, चिकुर्डे 2, बावची 1, मर्दवाडी 1, रेठरेहरणाक्ष येथील 2 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या. आटपाडी 13, आवळाई 1, दिघंची 2, शेटफळे 2, हिवतड 4, निंबवडे 1, कामथ येथील 2 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या. पलूस तालुक्यात अमरापूर 9, बुर्ली 11, वसगडे 7, बुरूंगवाडी 1, हजारवाडी 1, भिलवडी 7, कुंडल 20, अंकलखोप 4, सुखवाडी 1, सावंतपूर 4, पलूस 6, बांबवडे, नागराळे, सांडगेवाडी, धनगाव, ब्रह्मनाळ, माळवाडी, घोगाव, दुधोंडी, नागठाणे येथील प्रत्येकी 1 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली.
शिराळा 10, अंत्री बुद्रुक 3, मांगले 4, देववाडी, कापरी, आरळा, करुंगली, चिंचोली, सोनवडे, जाधववाडी, बिऊर, रिळे, पाडळी, अंत्री खुर्द येथील प्रत्येकी 1 व्यक्ती, हातेगाव 4, कोकरूड 3, चिखली येथील 2 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या. कडेगाव तालुक्यात चिंचणी 5, कडेगाव 8, खंबाळे 5, मोहिते वडगाव 1, रामापूर 2, शाळगाव, शिवणी, सोनकिरे, सोनसळ, तडसर, तोंडोली येथील प्रत्येकी 1 व्यक्ती, उमाळे मायणी 2, उपाळे वांगी 4, वडियेरायबाग 22 आणि वांगी येथील 1 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली. जत शहर 23, डफळापूर 4, उमराणी 2, बसर्गी 2, संख, कुंभारी, आसंगी तुर्क, कोसारी, अमृतवाडी येथील प्रत्येकी 1 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली. मिरज तालुक्यात आरग 8, नांद्रे 7, सुभाषनगर 2, कवठेपिरान 1, कसबे डिग्रज 1, तुंग 1, म्हैसाळ 1, पायपाचीवाडी 1, सलगरे 6, सोनी 2, बेडग 5, सावळी 1, तानंग 1, मालगाव 5, कवलापूर 2, बुधगाव 1, समडोळी 1, अंकली 1, जुनीधामणी 2, इनामधामणी 3, माधवनगर येथील 2 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या.







