पुणे (उपसंपादक प्रभाकर निकम) – रिपब्लिकन पार्टी आँफ इंडीया महाराष्ट्र रोजगार आघाडी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत जगताप यांचे सख्खे लहान भाऊ आद.सुनिल भि.जगताप.वय.38वर्ष,09/09/2020 रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले असता काल (दि. 10) केंद्रीय मंत्री ना.रामदास आठवले यांनी दुरध्वनीवरुन चंद्रकांत जगताप यांचे सांत्वन केले. तसेच ना.रामदास आठवले यांच्या आदेशाने रिपाइं (आठवले) महाराष्ट्र प्रदेश सचिव मा.हरेशभाई देखणे,जेष्ठ नेते ,प़ँथर, मुंबई प्रदेश सचिव रतन आस्वारे, प्रभाकर निकम (उद्योगपती), मुंबई संघटक सचिव कैलाश इंगळे, रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाचे बांद्रा तालुका उपाध्यक्ष संतोष बिरवटकर व पिंपरी चिंचवड रोजगार आघाडी कार्याध्यक्ष राहुल अलकोंडे यांनी त्यांची नवी मुंबई येथे भेट घेऊन सांत्वन केले.








