वर्धा (प्रतिनिधी मिलिंद कडू) – काल (दि.१०) वर्धा शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली त्यामुळे शहरातील नाले तुडुंब भरले होते तसेच रस्त्यावरून पाणी वाहत होते यातच वर्धा शहरात सुरु असलेल्या गटार नाल्यांच्या बांधकामामुळे व त्यामुळे रस्त्यांच्या झालेल्या दुर्दशेमुळे शहरवासीयांना त्रास सहन करावा लागला.
बऱ्याच दिवसापासून शहरात गटार नाल्यांचे बांधकाम सुरु आहे व त्यासाठी सिमेंटचे रस्ते फोडले जात आहेत परंतु रस्त्यांच्या खोदकामानंतर रस्त्याची दुरुस्ती वेळेवर केल्या जात नाही आहे याचाच प्रत्यय काल झालेल्या मुसळधार पावसामुळे शहर वासियांना झाला. काही दिवसापूर्वी शहरातील इंदिरा मार्केट रस्त्याचे गटार नाली बांधकामासाठी खोदकाम करण्यात आले त्यामुळे काल झालेल्या पावसामुळे शहरवासीयांना वाहन चालवितांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागली त्यामुळे शहरातील रस्त्यांची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी शहरवासियांकडून केल्या जात आहे.








