मुंबई (प्रतिनिधी विक्रम कुमार) – आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजी 70 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने भाजपा युवा मोर्चा, मुंबई वतीने दि.14 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2020 या कालावधीत “सेवा सप्ताह ” चे आयोजन केले आहे. रक्तदानातून रुग्णसेवा या उद्देशाने मुंबईतील 36 विधानसभा क्षेत्रात 70 ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकीची ऊर्जा निर्माण केली जाणार आहे.या उपक्रमात सर्व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन, मुंबईकरांमधील रक्तातील नातं अभंग ठेवू या, असे आवाहन भाजपा युवा मोर्चा मुंबईच्यावतीने करण्यात आले आहे.







