जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल आज (दि.११) प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यात ८६७ कोरोनाबाधित आढळून आले. त्यातील सर्वाधिक रुग्ण एरंडोल तालुक्यात १५५ आढळून आलेत. ५४१ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान आज १३ कोरोनाबाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, कोरोनामुळे मृत झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ९४६ झाली आहे.
आज आढळलेल्या ८६७ कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर- ८४, जळगाव ग्रामीण-४४, भुसावळ-७६, अमळनेर-५३, चोपडा-७२, पाचोरा-३३, भडगाव-३६, धरणगाव-२४, यावल-२१, एरंडोल-१५५, जामनेर-१६, रावेर-३७, पारोळा-२३, चाळीसगाव-४७, मुक्ताईनगर-१७, बोदवड-१९ आणि इतर जिल्ह्यातील १० असा समावेश आहे.
जिल्ह्यात आजवर कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३७ हजार ३०७ झाली असून त्यापैकी २६ हजार ३८७ कोरोनाबाधितांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून सद्यस्थितीत ९ हजार ९७४ कोरोनाबाधित कोवीड रूग्णालयात उपचार असल्याची माहिती, शासकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे







