शितल जडे जेसीआय ऑफ़ डायमंड समाजसेविका पुरस्काराने सन्मानित

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – जेसीआय डायमंड सिटी तर्फे यंदाचा जेसीआय ऑफ़ डायमंड समाज सेविकेचा २०२० चा पुरस्कार श्रीमती शितल संजय जडे यांना जेसीआय चे जेसी.निर्मल मुणौत यांच्या अध्यक्षतेखाली झोन व्हाईस प्रेसिडेंट जिनल जैन व प्रोजेक्ट कोर्डीनेटर सुशील अग्रवाल यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाप्रसंगी रायसोनी अभियांत्रिकी कॉलेज चे प्रोफ.रफिक शेख सर, पोलीस सेवा संघटना महाराष्ट्र राज्यचे जिल्हा अध्यक्ष भावेश ठाकूर, जळगांव शहर अध्यक्ष तिलोत्तमदास (अतुल) बोंडे, सेवाश्रम फाऊंडशेनचे अध्यक्ष विवेक ठाकरे, पोलीस सेवा संघटनेचे सदस्य ललित राणे व राकेश शिंदे हे उपस्तीथ होते. शितल जडे ह्या श्री एच.बी.संघवी हायस्कूल खेड्गाव नंदीचे येथे माध्यमिक शिक्षिका आहेत. त्याच बरोबर त्या समाजसेविका, लेखिका,कवियत्री असून जळ्गाव जिल्ह्याच्या शिक्षक भारती संघटना व पोलीस सेवा संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here