महिला आर्थिक विकास महामंडळ अध्यक्षाची धरणगाव सदिच्छा भेट

धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – महाराष्ट्र शासन महिला आर्थिक बचत गटाच्या अध्यक्षा सौ ज्योतीताई ठाकरे यांची धरणगाव सदिच्छा भेट ज्योतीताई ठाकरे या आर्थिक बचत गटाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा असून त्यांना राज्यमंत्रीचा दर्जा आहे.
धरणगाव येथील बचत गटाच्या महिला व पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला आतापर्यंत 4 हजारो कोटी कर्ज हे महिलांना दिले गेले. ग्रामीण भागातील महिला सक्षम कश्या होतिल यासाठी त्यांच्या जळगाव जिल्ह्यात दोन दिवसाच्या दौरा आयोजित करण्यात आला आहे धरणगाव येथे त्यांचे स्वागत जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ,महिला जिल्हा संघटक सौ महानंदाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर,चर्मकार समाजाचे कार्याध्यक्ष भानुदास आप्पा विसावे, न.पा.चे उपाध्यक्षा सौ कल्पना विलास महाजन,महिला तालुका अध्यक्षा सौ अश्विनी भाटिया,शहर अध्यक्षा रत्नाताई धनगर,नगरसेविका सौ आराधना पाटील,सौ माधुरी निलेश चौधरी,सौ मैनाताई शेख,नौशाद शेख,सौ सायरा शेख,कु.नेहा प्रकाश पाटील,नगरसेवक भागवत अप्पा चौधरी,नंदकिशोर पाटील,अजय चव्हाण,नगरसेवक किरण मराठे,नंदकिशोर पाटील,रवींद्र जाधव,कमलेश बोरसे,अरविंद्र चौधरी,विनोद रोकडे,गोलु चौधरी,सतीष बोरसे,महिला बचत गट च्या बघिणी जिल्हा समन्वयक श्री अलीम शेख,पी ए अशोक अतीत आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here