निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान फूड बँकेचे कार्य अविरत
जळगाव (प्रतिनिधी निलेश पाटील) – येथील निराधारांसाठी आधार ठरलेल्या निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानच्या फूड बँकेचे रस्त्यावरील निराधार आजीआजोबांना जेवण वाटपाचे कार्य अविरत सुरु असून, आजचे जेवण सुनीलजी बाफना व जळगाव जनता बैंकचे अध्यक्ष गुरुवर्य अनिल राव सर यांच्या पत्नी प्राध्यापिका सौ.मुग्धा राव यांच्याकडून त्यांची बहिणीच्या स्मृतीप्रित्यार्थ देण्यात आले. हे जेवण निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान फूड बँकेच्यावतीने धीरज जावळे व प्रमोद जावळे यांनी वाटप केले.







