सिद्देवाडी येथे अवैधरित्या मुरुम उत्खननाबाबत तहसीलदारांना शिव वाहतूक सेनेचे निवेदन

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – सिद्देवाडी येथे अवैधरित्या मुरुम उत्खनन करुन रोडच्या कामासाठी वापरला होता, याबाबत दि.२८/२/२०२० रोजी तहसिलदारांना निवेदन दिले होते की, आपण अवैधरित्या सुरु असलेले मुरुम उत्खननावर कार्यवाही करा अन्यता आंदोलनाचा इशारा दिला होता,
सदर निवेदनाचे लेखी उत्तर दिले की, सदर मुरुम उपसा परवांगीने सुरु आहे. सदर मुरुम उत्खननाची रॉयल्टी भरलेली पावती आम्हाला दाखवली नाही सदर जागेचा स्पॉट पंचनामासुध्दा आमच्यासमक्ष केला नाही तरी मिरज तालुक्यात अवैधरित्या मुरुम उत्खनन रोडच्या नावावर बेसुमार सुरु आहे व त्याची राजरोसपणे किरकोळ विक्री सुरु आहे तरी मिरज तालुक्यात सुरु असलेला मुरुम उपस्यावर तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा शिव वाहतुक सेना रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करेल व आंदोलनापासुन होणारे परिणामास तहसिलदार मिरज हे सर्वस्वी जबाबदारी असेल, असे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले. त्यावेळी शिव वाहतुक सेना सांगली जिल्हा अध्यक्ष किरणसिंह राजपुत, जिल्हा उपाध्यक्ष, गजानन मोरे,मिरज तालुका अध्यक्ष अनिल पाटील शहर अध्यक्ष किशोर बाबर सचिन आलकुंटे, आनंद राजपुत कोमल कवठेकर इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here