मुंबई (विशेष प्रतिनिधी) – नमो ग्रुप फाऊंडेशन प्रदेश महामंत्री व राज्य प्रवक्ता पदी ओबीसी नेते अनिल महाजन यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
नमो ग्रुप फाऊंडेशनचे प्रदेश अध्यक्ष प्रमोद परदेशी यांनी राष्ट्रीय कार्यकारणीची मान्यता घेऊन महाराष्ट्र राज्याची कार्यकारणी जाहीर केली आहे. अनिल महाजन यांच्या समाजिक कार्याची दखल घेऊन यांच्यासह एकूण २३ लोकांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
निवडण्यात आलेल्या कार्यकारिणीत प्रदेश महासचिव व प्रदेश प्रवक्ता अनिल महाजन, प्रदेश महासचिव शंकरराव वाघ, प्रदेश उपाध्यक्ष – शरद राठोड, डॉ.देवेंद्र खैरनार, भूषण पाटील, योगेश भामरे, आर.के.दिवाकर, प्रदेश सचिव – डॉकेयुर चौधरी, प्रविण कुंडलकर, रविंद्र महाजन, जितू बंब, प्रदेश कोषाध्यक्ष रेवणसिध्द माने, प्रदेश सहसचिव राजू शाह, अक्षय ब्राह्मणकर, प्रदेश संपर्कप्रमुख अनंत कुलकर्णी, संयोजक सोशल मिडीया आणि आय.टी.सेल सिध्दार्थ भोजने, प्रदेश अध्यक्ष युवक विनायक पाटील, कु.आदिती खामकर, प्रदेश कार्यालय मंत्री अमोल ठाकर, विशेष निमंत्रित सदस्य हितेश शेठ, ॲड.सुरेंद्र सोनावणे, भरत पटेल यांची निवड करण्यात आली आहे.
अनिल महाजन यांना व नवनियुक्त सदस्यांना राज्यभरातून सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर व पदाधिकारी शुभेच्छा देत आहेत.








