कोरोनाबाधित असल्याचे सांगून घराबाहेर सांगणाऱ्या पतीला पत्नीने पकडले रंगेहाथ…

गाझियाबाद – उत्तरप्रदेशातील मुरादाबाद येथे तैनात एक अधिकारी कोरोना विषाणूच्या नावाने आपल्याच पत्नीची फसवणूक करत असल्याचं समोर आलं आहे. हा अधिकारी गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या नोएडा येथील घरीच जात नव्हता. ज्यावेळी पत्नीने त्याला फोन करुन चौकशी केली त्यावेळी त्याने आपल्याला कोरोना झाल्याचं सांगत होम आयसोलेशनमध्ये असल्याचं म्हटलं. त्यामुळे काळजीपोटी पत्नी त्याला दररोज फोन करुन त्याच्या तब्येतीची चौकशी करत असे. त्याच दरम्यान एका व्यक्तीने त्या महिलेला फोन करुन सांगितले की, तिचा पती एका अन्य महिलेसोबत गाझियाबाद येथे राहत आहे.
आपल्या पतीबाबत ही माहिती मिळाल्यानंतर या अधिकाऱ्याच्या पत्नीने थेट गाझियाबाद गाठलं. गाझियाबाद येथे पोहोचून पत्नीने आपल्या पतीला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रंगेहात पकडला गेल्यानंतर या अधिकाऱ्याने आपल्या पत्नीशीच वाद घातला.
या अधिकाऱ्याच्या पत्नीने घडलेल्या प्रकरणाबाबत पोलीस महानिरिक्षक आणि राज्यपालांना ट्वीट करुन तक्रार केली आहे. यामध्ये म्हटलं आहे की, अधिकारी सध्या मुरादाबाद येथे ड्युटीवर तैनात आहे आणि स्वत: कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं सांगत नोएडा येथील आपल्या घरी येत नाहीये.
या अधिकाऱ्याची पत्नी आणि मुलं ही नोएडामध्ये राहतात. पीडित महिलेने पुढे सांगितले की, ती गुजरातची निवासी आहे. २८ वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला होता. या दाम्पत्याला दोन मुलं आहेत. त्यापैकी एक २५ वर्षीय मुलगी आहे तर दुसरा मुलगा हा २० वर्षीय आहे. तर या प्रकरणात अधिकाऱ्याने आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.
असंही म्हटलं जात आहे की, या घटनेच्या संबंधित एक व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. ज्यामध्ये हा अधिकारी दिसत नाहीये मात्र, सरकारी गाडीच्या चालकाला अधिकाऱ्याची पत्नी ओरडताना दिसत आहे. या संपूर्ण घटनेप्रकरणी पोलिसांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here