नाशिक (विशेष प्रतिनिधी इजि.कुबेर जाधव) – वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या कामगार संघटनेने धाराशिव उद्योग समुहा बरोबर यशस्वी सामंजस्य करार केला. कामगार राज्य मंत्री बच्चू कडु यांच्या आदेशाने सहा महिन्यांपूर्वी कामगार उपायुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत त्वरीत करार करणेसंदर्भात तात्काळ कारवाई करत करार करुन देण्यात आला. त्या कराराची प्रत सहायक आयुक्त शिर्के यांना देण्यात आली.त्याप्रसंगी धाराशिव कारखान्याचे संचालक आबासाहेब खारे , संतोष कांबळे ,संदीप खारे, युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे, कार्याध्यक्ष कुबेर जाधव, उपाध्यक्ष वसंत पगार आदी उपस्थित होते.
साधारणपणे २५ वर्षा पूर्वी युती सरकारच्या काळात राजकीय साडेसाती व कामगारामधील आपापसातील बेबनावामुळे पाच वर्षे बंद असलेली नाशिक जिल्हा सहकारी सुत गिरणी तत्कालीन सहकार मंत्री जयप्रकाश मुंदडा, आदिवासी विकास मंत्री स्व.ए. टी. तथा दादासाहेब पवार , आरोग्य मंत्री स्वर्गिय दौलत राव (बाबा) आहेर, तत्कालीन विधानसभा सभापती ना.सं.फंरादे यांच्यासंमतीने महाराष्ट्र शासन व कामगार संघटनेशी पाच वर्षांसाठी शुन्य भांडवलावर चालवावयास दिली होती. कामगारांनी ती सूतगिरणी यशस्वीपणे चालवून राज्यातील इतर सूत गिरण्यासमोर आदर्श निर्माण केला होता.
त्याचप्रमाणे वसाकातही धाराशिव उद्योग समुहाने कामगार संघटनेशी करार करून, कामगार उपायुक्त कार्यालयाकडून शिक्कामोर्तब व रितसर नोंदणी करून मान्यता घेण्यात आली होती. या यशस्वी कराराबाबत कामगार राज्यमंत्री बच्चू कडू, देवळा चांदवडचे आमदार राहुलदादा आहेर, धाराशिव उद्योग समुहाचे अध्यक्ष अभिजीत पाटील, अवसायक राजेंद्र देशमुख यांचे वसाका मजदुर युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे, कार्याध्यक्ष कुबेर जाधव, उपाध्यक्ष वसंत पगार, इतर पदाधिकारी व कामगारांकडून आभार व्यक्त होत आहेत.
Home उत्तर महाराष्ट्र नाशिक वसंतदादा सह. साखर कारखाना कामगार संघटनेचा धाराशिव उद्योग समुहाबरोबर यशस्वी सामंजस्य करार







