कोविड – १९ आणि तंबाखुमुक्ती या विषयावर पालघर जिल्हा स्तरीय ऑनलाईन कार्यशाळा संपन्न

मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरूण चव्हाण) – कोरोना कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर आरोग्य, स्वच्छता, पोषक आहार, तणाव निर्मूलन व तंबाखुमुक्ती या विषयावर झूम अॅपद्वारे जिल्हा परिषद शिक्षण विभाग पालघर, आरोग्य विभाग, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, सलाम मुंबई फाउंडेशन, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय ऑनलाईन वेबिनार घेण्यात आली होती.
जिल्हा परिषद पालघर शिक्षण विभागाचे प्राथमिक शिक्षणाधिकारी लता सानप व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संगिता भागवत यांनी संबंधित कार्यशाळेला उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच पालघर जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, सर्व विस्तार अधिकारी, सर्व केंद्र प्रमुख आणि प्रत्येक तालुक्यातील ५ तज्ञ, मार्गदर्शक, शिक्षक यांना तंबाखू मुक्त शाळेचे ११ निकष विषयी व टोबॅको फ्री स्कुल या अॅप बद्दल माहिती सलाम मुंबई फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक जयेश माळी यांनी दिली. तसेच येलो लाईन कॅम्पेन विषयी माहिती तंबाखू नियंत्रण उपक्रम कार्यक्रमाचे डाॅ. अमर खिराडे यांनी दिली. त्याचबरोबर नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यचे पालघर जिल्हा संघटक मिलिंद रूपचंद पाटील यांनी तंबाखूमुक्तची संकल्पना ( शपथ ) घेतली. या सर्वांच्या सहकार्याने तंबाखूमुक्त शाळा अभियान ऑनलाईन जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here