मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरुण चव्हाण) – कोरोना कोविड – १९ चा वाढत प्रादुर्भाव पाहता त्यावर आळा कसा घालता येईल. यासंबंधीची माहिती देण्यासाठी शनिवार, दिनांक १२ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता विक्रोळी कन्नमवार नगर २ येथील सिद्धी महिला कल्याणकारी संस्थेच्या कार्यालयात हा कार्यक्रम करण्यात आला.
कोरोनामुळे घरी बसलेल्या महिलांना रोजगार कसा मिळेल. कोणता व्यवसाय करता येईल? लोन घेण्यासाठी कोणकोणत्या सरकारी योजना आहेत. त्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. त्याचप्रमाणे रेशनसंबंधात त्यांना येणाऱ्या समस्यांचे देखील निरसन यावेळी करण्यात आले. शिवचाया, स्वयंभू, प्रगती विद्यालय, इंदिरा विकास या कन्नमवार नगर २ मधील विभागातील घरकाम करणाऱ्या आणि सफाई कामगार महिला यावेळी उपस्थित होते. या महिलांना दिशा ग्रुपचे अध्यक्ष दिनेश शेट्टी तसेच विक्रोळी नगरसेवक उपेंद्रजी सावंत यांच्या सहकार्याने सॅनिटायझर, मास्क, आर्सेनिक गोळ्यांचे वाटप ही करण्यात आले. जवळजवळ ११२ महिलांना संस्थेच्या अध्यक्षा सौ. स्मिता कवडे यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सदस्या गौतमी शिंदे, संगीता ओडपल्ली, हसीना शेख आणि सुषमा लोखंडे यांनी सहकार्य केले. कोरोना कोविड – १९ च्या परिस्थितीत नियमांचे पालन करूनच हा कार्यक्रम संपन्न झाला.







