साताऱ्याच्या राजघराण्यातील स्नुषा चंद्रलेखाराजे भोसले यांचे निधन

सातारा (विशेष प्रतिनिधी सोमनाथ जाधव) – छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, माजी नगराध्यक्ष श्री. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या सुविद्य पत्नी श्रीमंत सौ. चंद्रलेखाराजे भोसले यांचे दुःखद निधन झाले.
महिला मंडळाची शाळा, विविध सामाजिक संस्थांच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. सातारा शहरातील धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा हिरीरीने सहभाग असतं. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्यावर सातारा व पुणे येथील रुग्णांलयामध्ये उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत खालावली होती. त्यानंतर त्यांच्यावर अदालत राजवाडा येथेच उपचार सुरु होते.
अत्यंत मनमिळावू सर्वांशी आपुलकीने वागणाऱ्या राजघराण्यातील असूनसुध्दा सामान्य लोकांशी सामान्यपणेच वागणाऱ्या अश्या सातारा येथील श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे भोसले यांच्या सुविद्य पत्नी श्रीमंत छत्रपती चंद्रलेखाराजे भोसले यांचे आज दुपारी निधन झाले.
अदालत वाडा येथे त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले असून सायंकाळी त्यांच्यावर संगम माहुली येथे अंतीम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांना एक कन्या वृषाली या असून त्या त्यांची अनेक वर्ष सेवा करीत होत्या. त्याच जाणं सातारा वासीयांच्या मनाला चटका देण्या सारखं झाले आहे त्याना बुलंद पोलिस टाइम्स्‌तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here