अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या जिल्हा संघटक पदी कु.राधा कुटे यांची नियुक्ती

नाशिक (प्रतिनिधी) – अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र (राज्य) या सामाजिक संघटनेच्या नाशिक जिल्हा संघटक पदावर कुस्तितील सुवर्णकन्या व हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर या ठीकाणी झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत तसेच पुणे या ठीकाणी झालेल्या खाशाबा जाधव या राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून महाराष्ट्रासह नाशिक चे नाव राष्ट्रीय पातळीवर चमकविणारी कु.राधा कुटे यांची ओळखपत्र व नियुक्तीपत्र गुलाबपुष्प देवुन अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे प्रदेश अध्यक्ष मा.रविंद्र दादा जाधव यांचे हस्ते नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीबद्दल नाशिक जिल्हा कार्यकारिणीत उपाध्यक्षा मनिषा पवार, मनिषा म्हसदे, संदीप साबळे, निशा रोकडे, रेखा मंजुळकर, सुमय्या खान, नितिन जाधव, संदेशा पाटील, आदींनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here